Pahalgam Terrorist Attack : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याचा तपास NIA कडून करण्यात येत असून त्याच संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Terrorist) पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले असं NIA च्या सूत्रांमार्फत समजतंय. NIA च्या अहवालात पाकविरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तान लष्कराने कट रचल्याची माहिती असल्याचे समोर आलं आहे. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवली होती असंही तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी तब्बल दीडशे जणांची चौकशी करण्यात आली. तसंच, घटनास्थळी मिळालेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. NIA हा अहवाल लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांकडं सादर करणार आहे.
खळबळजनक! 3 दहशतवादी, 3 पर्यटन स्थळे, 7 दिवस आणि 2 सिग्नल; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उलगडा झाला
पहलगाम येथील दहशतलवादी हल्ल्यानंतर जो प्राथमिक तपास करण्यात आला त्याचा सविस्तर रिपोर्ट एनआयएने तयार केला आहे. यामध्ये पाकिस्तान विरोधातील सर्व पुरावे सापडल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पाकिस्तानी आर्मी, लष्कर आणि इतर दहशतवादी संघटना त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहेत.
त्याचसोबत हल्ला करणारे दहशतवादी हे बैसरन व्हॅलीमध्ये नेमके कसे आले, पहलगामपर्यंत ते कसे पोहोचले, त्यांनी कोण-कोणत्या मार्गांचा वापर केला. तसंच, त्यांनी जिथे शस्त्र लंपवली त्या ठिकाणाचा उल्लेखही एनआयएच्या अहवालात करण्यात आला आहे. निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या, त्यांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये सर्व शस्त्रास्त्र लपवून ठेवली होती, असं अहवालात नमूद करण्यात आले आहे.