Download App

NIA चा मोठा खुलासा, ‘त्या’ दिवशी बॉम्बस्फोटातील आरोपी भाजप मुख्यालयात घडवणार होते स्फोट

 B’luru Cafe Blast : बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 01  मार्च रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएने आज (9 सप्टेंबर) चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र

  • Written By: Last Updated:

Rameswaram Cafe Blast : बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये (Rameswaram Cafe) 01 मार्च रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी एनआयएने आज (9 सप्टेंबर) चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एनआयएने (NIA) धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपींनी 22 जानेवारी रोजी कर्नाटक भाजपच्या मुख्यालयात आयईडी स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती असा धक्कादायक खुलासा एनआयएकडून करण्यात आला आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अपयशी करण्यासाठी ही योजना आखली गेली होती असा खुलासा देखील एनआयएकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे या वर्षी 1 मार्च रोजी बेंगळुरूच्या ITPL, ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये IED स्फोटात नऊ जण जखमी झाले होते तसेच या स्फोटात हॉटेलच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणाचा एनआयएकडून 03 मार्चपासून तपास सुरु करण्यात आला होता. या प्रकरणात मुसावीर हुसेन शाजिब, अब्दुल मतीन अहमद ताहा, माझ मुनीर अहमद आणि मुजम्मिल शरीफ अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध IPC, UA(P) कायदा, स्फोटक पदार्थ कायदा आणि PDLP कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

एनआयएच्या या आरोपत्रात आयएसआयएसच्या हल्ल्यांबाबतही खुलासा करण्यात आला आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या दिवशी मोठ्या हल्ल्याची योजना तयार करण्यात आली होती. या दिवशी बेंगळुरू येथील भाजप कार्यालयावर हल्ला करण्याची तयारी करण्यात आली होती असा खुलासा देखील या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

CBI ची मोठी कारवाई, दिल्ली प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्याच्या घरातून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त

follow us