नवी दिल्ली : दिल्लीतील खळबळजनक निक्की यादव हत्या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा झाला. (Nikki Yadav case) या हत्या प्रकरणातील आरोपी साहिल गेहलोत पोलिसांसमोर अनेक धक्कादायक गुपिते उघड करत आहे. आरोपी साहिलने पोलिसांना सांगितले आहे की, त्याचे आणि निक्की यांनी आर्य समाजाच्या मंदिरात लग्न केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा दावा आहे की, निक्की त्याला लग्नाचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर (Social media) व्हायरल करण्याची धमकी देत होती. साहिल म्हणतो की, निक्की ज्या महिलेशी लग्न करणार आहे, तिला पुरावा पाठवण्याची धमकी देत होती.
साहिल गेहलोतने पोलिस (Delhi Police) चौकशीत निक्की यादवची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली. हत्येनंतर निकीचा मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
निक्की आणि साहिलचे लग्न कुठे झाले ?
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल आणि निक्कीचे लग्न ऑक्टोबर 2020 मध्ये ग्रेटर नोएडा येथील आर्य समाज मंदिरात झाले. मात्र, दोघांनीही निबंधक कार्यालयात लग्नाची नोंदणी केली नसल्याचा दावा आता केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिलने खुलासा केला आहे की, निक्की यांचे लग्नाचे प्रमाणपत्र होते, जे आर्य समाज मंदिराने जारी केले होते.
जेव्हा निक्कीला साहिलने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याची माहिती मिळाली, तेव्हा तिने साहिलला आपला निर्णय बदलण्यास सांगितले. इतकंच नाही तर साहिलने लग्नाला नकार दिला नाही तर लग्नाचं प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करेन किंवा तो ज्या महिलेशी लग्न करणार आहे. त्या महिलेच्या कुटुंबियांना सर्व पुरावे देईन, अशी धमकीही निकीने दिली.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी निकीचा मृतदेह सापडला
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दिल्लीच्या बाहेरील मित्राव गावात आरोपी साहिलच्या मालकीच्या ढाब्याच्या रेफ्रिजरेटरमध्ये निक्की यादवचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी 10 फेब्रुवारी रोजी निक्कीची हत्या केली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्याने दुसरे लग्न केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिलचे वडील, त्याचे दोन चुलत भाऊ आशिष, नवीन आणि दोन मित्र अमर आणि लोकेश यांनाही संपूर्ण कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली .