Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय!

Delhi Mayor Election : दिल्लीच्या महापौरपदी ‘आप’च्या शैली ओबेरॉय!

पुणे : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर (Delhi Mayor) पदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या (AAP) पहिल्या महापौर म्हणून मान शैली ओबेरॉय (Shelly Oberoi) यांना मिळाला आहे. अटीटतीच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांचा ३४ मतांनी पराभव केला. आपच्या शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली. दहा वर्षानंतर पुन्हा एकदा महापौर पदाचा मान एका महिलेला मिळाला आहे.

दिल्ली महानगरपालिकेत २०११ साली म्हणजे दहा वर्षांपूर्वी भाजपच्या रजनी अब्बी या महापौर झाल्या होत्या. ४ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर तब्ब्ल ५८ दिवसानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडली.

दिल्ली महापालिकेत २५० जणांची सदस्य संख्या आहे. महापौर पदासाठी १३८ मतांची गरज होती. आम आदमी पक्षाकडे १३४ नगरसेवक, १३ आमदार आणि ३ खासदार अशी सदस्यसंख्या होती. तर भाजपकडे १०४ नगरसेवक, ७ खासदार आणि एक आमदार असे सदस्य होते. महापौर पदाच्या निवडणुकीत शैली ओबेरॉय यांना १५० तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मतं मिळाली आहेत. शैली ओबेरॉय यांनी ३४ मतांनी रेखा गुप्ता यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या ९ सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube