Budget 2023 : अर्थसंकल्पात देशाची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2023-24 साठी7 टक्के दराने वाढणार आहे. (Budget 2023) अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. (Budget ) भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अंत्योदय योजनेंतर्गत गोरगरिबांसाठी मोफत धान्य पुरवठ्यात एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे.
शेतकरी, महिला आणि अनुसूचित जातीचा विकास केला, जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासावर भर दिला. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चरची निर्मिती केली. भारत जगातील सर्वात मोठा अन्न उत्पादक आणि निर्यातदार आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील 7 प्राधान्यक्रमांची माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रम सांगितले. यामध्ये इन्फ्रा, ग्रीन ग्रोथ, फायनान्शियल सेक्टर, युथ पॉवर यांचा समावेश करण्यात आला.
पायाभूत सुविधांमधील भांडवली गुंतवणुकीत ३३ टक्क्यांनी वाढ करून ती १० लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या ३.३ टक्के आहे. सर्व शहरांमध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करणार. त्यात मॅनहोलचं रुपांतर मशीन होलमध्ये करणार आहेत.
येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा. गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड. तर 50 नवी विमानतळ उभारणार, मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च. 44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच, अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक वर्ष 2023-24साठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशात 100 नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.