नवी दिल्ली : देशातील रस्त्यांचं मोठं जाळ तयार करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा मोलाचा वाटा आहे. देशातील वाहतूक कोंडी असो किंवा अन्य बाबी असो गडकरी नेहमीच वेगवेळ्या क्लृप्त्या शोधून काढत असतात. त्यांच्या या क्लृप्त्यांची जोरदार चर्चादेखील होते. मात्र, देशातील एका गंभीर प्रश्नावर उत्तर देताना आंतराष्ट्रीय स्तरावर या समस्येमुळे मला तोंड लपवण्याची वेळ येते अशी नाराजी गडकरींनी बोलून दाखवली आहे. ते गुरूवारी (दि.12) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते. (Nitin Gadkari On India Road Accident)
रस्ते अपघातातील जखमींना मिळणार मोफत उपचार : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
लोकसभेत बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांबाबत (Road Accident) आपल्या देशाचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी मला तोंड लपवावे लागते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाकडून विविध प्रयत्न करण्यात आले, मात्र अपघात कमी झाले नसून ते वाढले आहेत. जोपर्यंत समाजाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आपल्या मानवी वर्तनात बदल होत नाही आणि कायद्याचा धाक राहत नाही, तोपर्यंत रस्ते अपघातांना आळा बसणार नाही, असेही गडकींनी सांगितले.
📍 नई दिल्ली | लोक सभा
सड़क दुर्घटना में होने वाली मौतों के आंकड़ों के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #LokSabha #WinterSession2024 pic.twitter.com/8Bx8PtHHtj
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) December 12, 2024
अपघात कमी होण्याऐवजी वाढत आहेत : गडकरी
देशात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील 60 टक्के पीडित 18 ते 34 वयोगटातील आहेत. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या संख्येबद्दल ते म्हणाले की, “इतके लोक ना कोणत्या युद्धात, ना कोविडसारख्या महामारीत किंवा दंगलीत मरतात पण रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू होतो ही चिंतेची बाब आहे.
रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.
रस्ते अपघातांशी संबंधित खराब रेकॉर्डचा संदर्भ देत रस्ते मंत्री गडकरी म्हणाले, “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदांना जातो आणि तेथे रस्ते अपघातांवर चर्चा होते तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण वाढते अपघात रोखण्यात आपल्या देशाचा रेकॉर्ड सर्वात घाणेरडा आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी खासदारांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करावेत, असे सांगत परिवहन विभागाच्या मदतीने सर्व शाळा, संस्था इत्यादींमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे असे ते म्हणाले.
तीन दिवस सुट्टी घ्या, पण पोरं जन्माला घाला; लोकसंख्या वाढीसाठी अजब-गजब निर्णय!
ड्रायव्हिंग लायसन्सबाबत कठोरता असावी
गडकरींच्या म्हणण्यानुसार NITI आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की ,रस्ते अपघातातील 30 टक्के बळी योग्यवेळी उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे सरकारने उपचारांसाठी कॅशलेस योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू केला जात आहे, त्यानंतर तो देशभर लागू केला जाईल. यावेळी गडकरींनी ड्रायव्हिंग लायसन्सबाबत कठोरता आणण्याची गरज असल्याचेही सांगितले. जगात कुठेही ड्रायव्हिंग लायसन्स मिळणे सोपे असेल तर, त्या देशाचे नाव भारत आहे. पण आम्ही त्यात सुधारणा करत असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.
📍 नई दिल्ली | लोक सभा
सड़क दुर्घटना में होने वाली मौतों के आंकड़ों और सड़क सुरक्षा के संबंध में केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी का उत्तर। #QuestionHour #LokSabha #WinterSession2024 pic.twitter.com/fN0QB9CtWG
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) December 12, 2024