रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.

रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारं रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? जाणून घ्या.

Road Hypnosis : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता समोर येत आहे. टायर फुटल्यामुळं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं आहे. तसेच रोड हिप्नॉसिसमुळं (Road Hypnosis) हा अपघात झाल्याचाही अंदाज वर्तवण्यात येतो. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत सध्या तपास सुरू आहे. मात्र, या अपघातामुळं पुन्हा चर्चत आलेला रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमकं काय? ते कशामुळं होतं? ते टाळण्यासाठी काय करावं? याच विषयी जाणून घेऊ. (What exactly is road hypnosis What to do to avoid it)

रोड हिप्नॉसिस म्हणजे नेमके काय?
रोड हिप्नॉसिस याला रोड संमोहन असंही म्हणतात. रोड हिप्नॉसिस ही एक शारीरिक स्थिती आहे, ज्याबद्दल बहुतेक वाहनचालक पूर्णपणे अनभिज्ञ असतात. मोठ्या महामार्गावर वाहन चालवल्याने चालक किंवा प्रवाशांसाठी एक विशिष्ट नीरसपणा निर्माण होतो. यामुळे लक्ष विचलित होते. याला रोड हिप्नॉसिस म्हणतात. रस्त्यावर गाडी घेऊन उतरल्यानंतर सुमारे अडीच तासानंतर रोड हिप्नॉसिस होऊ शकते. या काळात संमोहित चालकाचे डोळे उघडे राहतात, पण मन, मेंदू सक्रिय नसतो. तो स्वतःच्या डोळ्यांनी काय पाहतो हे त्याला समजू शकत नाही. त्याचे विश्लेषण करू शकत नाही.

भाजपाचा डबलगेम! घराणेशाहीवर प्रहार पण, निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युलाही ‘त्याच’ पक्षात… 

रोड हिप्नॉसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो किती वेगाने जात आहे किंवा त्याच्या समोरील कारचा वेग किती याचे विश्लेषण तो करू शकत नाही. लांब रस्त्यावर रोड हिप्नॉसिसपूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखं वाटून चालक नुसते बघत राहतो. रोड हिप्नॉसिस हे अनेकवेळा अपघाताचं पहिलं कारण मानलं जातं.

चालकांनी काय करावं?
1. रोड हिप्नॉसिसपासून स्वतःला वाचवण्यासाठी, दर 2.5 तासांनी थांबावं विश्रांती घ्यावी.
2. वाहन थांबवून दर अडीच तासांनी 5-6 मिनीटं थोडं चालावं. चहा किंवा कॉफी प्यावी. त्यामुळं आलेली सुस्ती उडेल.
3. गाडी चालवता चालवता ब्लॅंक होणं थांबवा. गाडी थांबवून थोडा दीर्घ श्वास घ्या.
4. डोळ्यांवर पाणी मारावं, जेणेकरून डोळ्यांवरील ताण कमी होईल.
5. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने झोप घेणं टाळलं पाहिजे.
6. गाडी चालवण्यापूर्वी सर्दी, खोकला ही औषधं घेणं टाळावं.

महत्वाचं म्हणजे, जर तुम्हाा शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि प्रवाशांना मृत्युकडे नेत आहात. अशा वेळी गाडी थांबवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube