माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतलं…,पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतलं…,पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

Rohit Power on ED Inquiry : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत सापडले आहेत. ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. (Power) अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असं म्हणत रोहित पवारांना आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

ईडीने कारवाई केली

शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता पवारांच्या नातेवाईकांना कमी किंमतीमध्ये सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप ठेवला गेला आहे. रोहित पवारांसह काही जणांवर पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहेत. कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही असंही रोहित पवार म्हणाले. तसंच, ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं असा टोलाही त्यांनी लगावाला.

MSCB घोटाळ्यात ED चं आरोपपत्र; रोहित पवारांची मात्र ठाम भूमिका, ‘फितुरीला थारा नाही

सुरूवातीला ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये माझं नाव नव्हत. नंतर, कुणाच्या दबावात आले माहित नाही. नंतर यात माझं नाव टाकण्यात आलं. ईडीला काही यात सापडल नसल्याने चार्ज शीट दाखल केल्याने आता ही लढाई न्यायालयात गेली आहे. ही गोष्ट चांगली झाली. मी चार्च शीटची वाट पाहत होतो. शेशन कोर्टापासून ही लढाई सुरू झाली ती सुप्रिम कोर्टापर्यंत जाईल. ही लढाई मीच जिंकणार. कारण, मी घाबरणारा, पळून जाणारा माणूस नाही. अस्सल मराठी माणूस कधीच भीत नाही हे लक्षात ठेवा.

प्रकरण काय?

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडने अवसायनात निघालेला छत्रपती संभाजी नगरमधील कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला. हा साखर कारखान्याची केवळ ५० कोटी रुपयांत विक्री करण्यात आली. नियमांचं पालन न करता हा व्यवहार झाला असून, हा कारखाना जाणूनबुजून कमी किमतीत विकण्यात आला, असा संशय ईडीला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या