तीन दिवस सुट्टी घ्या, पण पोरं जन्माला घाला; ‘लोकसंख्या’ वाढीसाठी अजब-गजब निर्णय!
Japan Low Birth Rate : एकीकडे कर्मचाऱ्यांचं मानसिक संतुलन चांगले रहावे म्हणून देशभरात विविध गोष्टींचं अवलंबन केले जात आहे. जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये फाईव्ह डेज विक आहे याशिवाय अन्य सुट्ट्यादेखील दिल्या जातात. मात्र, सध्या टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके (Yuriko Koike) यांनी कर्मचाऱ्यांसाठी फोर डेज विक आणि तीन दिवसांची सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शाररिक संतुलन नीट राहावे यासाठी नव्हे तर, देशाची लोकसंख्या (Population) वाढवी यासाठी घेण्यात आला आहे. सध्या या निर्णयाची जगभरातील कानाकोपऱ्यात जोरदार चर्चा सुरू असून, पोरं जन्माला घालण्यासाठी टोकिया प्रशासनाला असा अजब निर्णय का घ्यावा लागला? याचबाबत आपण विषय सोपामधून जाणून घेऊया…
लोकसंख्या वाढीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 2 किंवा 3 मुलांना जन्म दिल्यावर मिळणार वेतनवाढ
का घेण्यात आला असा निर्णय?
एकीकडे भारतासह अनेक देशांमध्ये वाढती लोकसंख्या चिंतेचा विषय बनलेला असतानाच दुसरीकडे मात्र जपान घटत्या प्रजनन दरामुळे चिंतेत पडला आहे. याच समस्येतून बाहेर येण्यासाठी आणि देशाची लोकसंख्या वाढवी यासाठी घेण्यात आला आहे. एप्रिल 2025 पासून मेट्रो शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला तीन दिवस सुट्टीचा पर्याय असेल असे टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी जाहीर केले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश जपानी जोडप्यांमध्ये प्रजनन क्षमता वाढवणे असून, सरकारतर्फे लोकसंख्या वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहे मात्र, असे असतानाही देशाच्या प्रजननचा दर लक्षणीयरीत्या घसरला आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये केवळ 727,277 बालकांचा जन्म झाला. गेल्या वर्षी दर महिला प्रति 1.2 मुलांपर्यंत घसरला. लोकसंख्या स्थिरतेसाठी किमान 2.1 दर आवश्यक असल्याचे आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
Population Control Law : लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा काय ?, संविधान काय म्हणते ? जाणून घ्या..
घटलेल्या प्रजननदराचं कारण काय?
घटलेल्या या संख्येमागचे प्रमुख कारण म्हणजे देशात वाढते ओव्हरटाईम वर्क कल्चर आणि महिला वर्गाचा करिअर घडवण्यामागे असलेला विचार असल्याचे बोलले जात आहे. वर्ड बँक डेटानुसार जपानमधील लैंगिक रोजगार असमानता इतर श्रीमंत देशांपेक्षा जास्त असून, गेल्या वर्षी पुरुषांच्या 72% च्या तुलनेत महिलांचा सहभाग 55% होता. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रस्तावित चार दिवसांच्या कामाच्या आठवड्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी अतिरिक्त वेळ मिळू शकतो असे बोलले जात आहे. टोकियो प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ज्या पालकांची मुले प्राथमिक शाळेत आहेत, त्यांना कमी काम करण्याचा पर्याय मिळेल, ज्यामुळे त्यांच्या पगारातही संतुलित कपात होईल, अशा पालकांसाठी ही योजना उपयुक्त ठरेल असे टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी म्हटले आहे.
सरकारच्या अपयशामुळे भारताची लोकसंख्या वाढली, अखिलेश यादवांनी समजून सांगितलं लॉजिक
2022 मध्ये 4 डे-वीक ग्लोबलद्वारे चार दिवसीय वर्क वीक फ्रेमवर्क जागतिक स्तरावर प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात आले होते. ज्यामध्ये सहभागी असलेल्या 90% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी हे वेळापत्रक कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याशिवाय सिंगापूरसारख्या इतर आशियाई राष्ट्रांनीही लवचिक कामाचे तास देण्यावर भर दिला आहे. त्यात आता जपानने लोकसंख्या वाढीसाठी कर्मचाऱ्यांना 4 डे विकची घोषणा केली असून, जगातील काही देशांमध्ये वाढता कामचा ताण कमी करण्यासाठी फाईव्ह डे कल्चर आहे. मात्र, जपानमध्ये लोकसंख्या वाढीसाठी सरकारला फोर डे विकची घोषणा करावी लागली आहे. त्यामुळे सरकराच्या या आगळ्या वेगळ्या निर्णयाचा येथील नागरिक कसा प्रतिसाद देतात आणि कमी झालेल्या लोकसंख्येला बूस्टर मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, लोकसंख्या वाढच्या या अनोख्या फॉर्म्युल्याची मात्र जगभरात जोरदार चर्चा आहे.