सरकारच्या अपयशामुळे भारताची लोकसंख्या वाढली, अखिलेश यादवांनी समजून सांगितलं ‘लॉजिक’
India Overtake China in Population : युनायटेड नेशन्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात सध्या चीनपेक्षा 20 लाख लोकसंख्या जास्त असून, देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. तर, दुसरीकडे चीनमधील जन्मदर खाली आला असून यंदा याची नोंद मायनसमध्ये नोंदवण्यात आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, जागतिक तज्ज्ञांनी भाकीत केले होते की, 2023 मध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू होतील आणि आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या (UNFPA) ताज्या आकडेवारीने याची पुष्टी केली आहे.
पण याच मुद्द्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यादव यांनी एक ट्विट करून देशातील लोकसंख्या वाढीची कारणे सांगितली आहेत. सरकारच अपयश हे लोकसंख्या वाढीच कारण असं त्यांनी सांगितलं आहे.
तापमानामुळे वाहनांचे स्फोट; इंडियन ऑइल नावाचा व्हायरल मेसेज किती खरा ?
चिंतनीय ख़बर : भारत की आबादी हुई सबसे अधिक
कारण : सरकार की विफलता
विवरण :
– ग़रीबी-बेरोज़गारी के कारण काम में हाथ बँटाने व कमाने के लिए व
– मेडिकल की कमी से बालमृत्यु के डर से अधिक बच्चे पैदा करना तथा कांट्रासेप्टिव्स का वितरण न होना।
– शिक्षा की कमी से जनसंख्या के दबाव को…— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 20, 2023
काय म्हणले आहे ट्विटमध्ये?
अखिलेश यादव यांनी लिहलं आहे की, “चिंताजनक बातमी : भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक झाली.
कारण : सरकारचे अपयश
यामध्ये त्यांनी याची कारणेही दिली आहेत.
गरिबी-बेरोजगारीमुळे कामाला आणि कमावण्यासाठी अधिकच मनुष्यबळ मिळेल म्हणून.
वैद्यकीय सेवांची कमतरता असल्यामुळे बालमृत्यू होण्याची भीती त्यामुळे अधिक मुलांना जन्म देणे आणि गर्भनिरोधकांचे वाटप न करणे
शिक्षणाअभावी लोकसंख्या वाढीचा दबाव समजत नाही.
उष्णतेची लाट…हवामान विभागाचा ‘या’ राज्यांना ‘हाय अलर्ट’
सहा दशकांत प्रथमच घटली चीनची लोकसंख्या
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी चीनची लोकसंख्या सहा दशकांत प्रथमच घटली आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारताची वार्षिक लोकसंख्या 2011 पासून सरासरी 1.2 टक्के वाढली आहे, जी मागील 10 वर्षांत 1.7 टक्के होती.
India surpasses China to become the world’s most populous nation with 142.86 crore people, says the United Nations.
According to UNFPA’s The State of World Population Report, 2023, India’s population has reached 1,428.6 million while China’s stands at 1,425.7 million, a… pic.twitter.com/kl3qexumkP
— ANI (@ANI) April 19, 2023
भारतामध्ये जगातील सर्वात तरुण लोकसंख्या
UNFPA च्या अहवालानुसार भारतातील 25% लोकसंख्या 0-14 वयोगटातील आहे, 18% 10-19 वयोगटातील आहे, 10-24 वर्षे 26%, 15-64 वयोगटातील लोकसंख्या 68% आहे तर,65 वरील वयोगटातील लोकसंख्या 7 टक्के आहे.