नर्सरी, केजी प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती, डोनेशनवर बंदी! पालकांना दिलासा अन् शाळांच्या मनमानीला चाप

nursery and KG admissions नर्सरी आणि केजीच्या प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Nursery And KG Admissions

Ban on interviews of children and donations for nursery and KG admissions : महाराष्ट्रातील नर्सरी आणि केजीच्या प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी मुलांच्या मुलाखती घेता येणार नाहीत. तसेच लेखी किंवा तोंडी परीक्षा घेण्यास आणि पालकांकडून देणगी अथवा निर्धारित शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम मागण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Call Me Bae S2 ची रिलीज डेट ठरली; 17 डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर होणार प्रीमियर

प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि पालकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने खासगी शाळांसाठी चार पानी मानक कार्यपद्धती (SOP) तयार केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

खरातच्या माध्यमातून तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या; रुपाली चाकणकरांबाबत रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवेश देताना मुलांची किंवा त्यांच्या पालकांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेता येणार नाही. तसेच लेखी किंवा तोंडी परीक्षा अथवा चाचणी घेण्यासही मनाई करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त शाळांना देणगी किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त पैसे मागता येणार नाहीत.

ती बैठक अन् शिंदेंना एक मिनिट उशीरा आलेला मेसेज निर्णायक ठरणार? शिंदेंच्या वकीलांचा जोरदार युक्तिवाद

याशिवाय शाळांना प्रवेश अर्ज, शुल्काची रचना, शुल्क भरल्याच्या पावत्या आणि लागू असलेल्या ठिकाणी प्रवेशासाठी घेतलेल्या सोडतीची नोंद व्यवस्थित ठेवावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील आवश्यक माहिती शाळेच्या दर्शनी भागात प्रसिद्ध करणे आणि पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणेही बंधनकारक करण्यात आले आहे.नियमांचे उल्लंघन झाल्यास पालकांना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करता येणार आहे.

नर्सरीपासून पहिलीपर्यंत प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित

प्रवेश प्रक्रियेतील नियमांसोबतच सरकारने पूर्वप्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वयही निश्चित केले आहे. २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून या वयोमर्यादेची अंमलबजावणी होणार आहे. नव्या नियमानुसार नर्सरीसाठी मुलांचे किमान वय तीन वर्षे, ज्युनिअर केजीसाठी चार वर्षे, सिनिअर केजीसाठी पाच वर्षे, तर इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची गणना संबंधित शैक्षणिक वर्षाच्या ३० जूनपर्यंत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूर्वप्राथमिक प्रवेश प्रक्रियेत एकसमानता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. मुलांची शैक्षणिक क्षमता तपासण्याच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या चाचण्या तसेच पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रवेश देण्याच्या पद्धतींना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

follow us