Download App

मिशन 2024: नितीश कुमार-ममता बॅनर्जी भेटीने विरोधी एकजुटीला धार

Nitish Kumar met Mamata Banerjee : मोदी विरोधात राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी (Opposition Unity) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या ते भेटी घेत आहेत. आज मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीनंतर आमची आघाडी कोणत्या आधारावर होईल हे वेळप्रसंगी ठरवले जाईल. माझ्या कोणत्याही अटी नाहीत हे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी नितीशजींना विनंती केली आहे की जयप्रकाशजी यांचे आंदोलन बिहारमधून सुरू झाले होते, त्यामुळे आपण बिहारमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. यामध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत असा संदेश द्यायचा आहे. व्हिजन आणि ध्येय स्पष्ट असेल तर आम्ही एकत्र लढू, हे नक्की.

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा, चर्चांना उधाण

त्या पुढं म्हणाल्या की, ही आघाडी कोणत्या आधारावर होईल, हे वेळप्रसंगी ठरवले जाईल. यावर माझा कोणताही आक्षेप नाही, भाजप शून्य व्हावे, असे मी आधीच सांगितले आहे. आम्ही एकत्र पुढे जाऊ. आमचा वैयक्तिक अहंकार नाही, आम्हाला एकत्र काम करायचे आहे.

नितीश कुमार म्हणाले की, जे सत्तेत आहेत ते फक्त स्वतःबद्दल बोलतात बाकी काही नाही, हा स्वातंत्र्याचा लढा आहे, आपण सावध राहायला हवे. हे लोक इतिहास बदलत आहेत. आता माहीत नाही, ते (भाजप) इतिहास बदलतील की काय करतील? प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही सर्वांशी बोलत आहोत. आमची खूप छान चर्चा झाली. आवश्यकतेनुसार भविष्यात इतर पक्षांना सोबत घेऊन चर्चा करू. ममताजींसोबत खूप सकारात्मक संवाद झाला.

Tags

follow us