Bihar Politics : सध्या बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Nitish Kumar) भाजपची (BJP) वाट धरली. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहे. नितीश कुमार हे आज भाजप नेते अश्विनी कुमार यांच्यासोबत बक्सरच्या ब्रम्हपूर मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असून दुपारी तीन वाजता ते सीएम पदाची शपथ घेतील, असं ठरलं आहे.
बिहारमध्ये सत्ता परिवर्तनाची अटकळ बांधली जात आहे. सत्ता परिवर्तनाची जबाबदारी भाजपवर आहे. आता पुन्हा एकदा रविवारी सकाळी 9 वाजता भाजप, सकाळी 10 वाजता जेडीयू आणि शेवटी एनडीए (जेडीयू-भाजप) यांची बैठक होणार आहे. यानंतर नितीश कुमार राज्यपालांची भेट घेऊन राजीनामे आणि नव्या सरकारला पाठिंबा देणारे पत्र सुपूर्द करतील. दुपारी ३ नंतर ते शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही रविवारी पाटण्यात पोहोचण्याची शक्यता आहे.
Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी ठरला ग्रँड स्लॅम चॅम्पियन
राजीनाम्यानंतर लगेच शपथ
आज नितीश कुमार यांनी जेडीयू आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली. त्यात भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणार असल्याचे आमदारांना सांगण्यात आले. त्याचवेळी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. प्रदेश प्रभारी विनोद तावडे यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यासह प्रदेश भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आता रविवारी सकाळी भाजप, जेडीयू आणि एनडीएच्या आमदारांची बैठक होणार आहे.
यानंतर नितीश कुमार राजीनामा आणि समर्थन पत्र घेऊन राजभवनात जाणार आहेत. आधी राजीनामा देणार, त्यानंतर काही तासांनी शपथ ते शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
भाजपची मोठी फिल्डिंग
दरम्यान, नितीश यांच्यासाठी भाजपने बिहारमधून आपल्या मित्रपक्षांना राजी केलं. मांझी यांनी आधीच सहमती दर्शवली होती. अमित शाह यांनी चिराग पासवान यांनाही नितीश कुमारांचं महत्व पटवून दिले. भाजपने उपेंद्र कुशवाह शाह यांनी यांनाही तयार केले आहे. एकूणच एनडीएमध्ये नितीश कुमारांचा समावेश झाल्यास कोणालाही अडचण. नितीशकुमार हे एनडीएमध्ये येण्यासाठी भाजपने मोठी फिल्डिंग लावली आहे.
काँग्रेसचे आमदार जेडीयूच्या संपर्कात
आरजेडीसाठी विशेषत: लालू-तेजस्वी यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचे आमदार अजूनही त्यांच्यासोबत आहे. तसेच लालू यादव यांना पक्षाने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र, राजद नेत्यांना अजूनही नितीश यांच्याकडून आशा आहेत. पण, काँग्रेससाठी ही चांगली बातमी नाही. पक्षाने पूर्णिया येथे आमदारांची बैठक बोलावली होती. ज्यात निम्मेही आमदार फिरकले नाहीत. परिणामी बैठकच तहकूब करावी लागली. तसे, काँग्रेसचे आमदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे.
खर्गेंना नो रिस्पॉन्स
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नितीश यांची समजूत घालण्यासाठी खर्गेंनी त्यांना अनेकदा फोन केला. पण, नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव आणि खर्गे यांचे फोन घेतले नाहीत. या प्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीश कुमार यांच्याशी एकदा नव्हे तर अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी फोन उचलला नाही.