जेडीयूमध्ये आता निशांत ‘राज’; नितीश कुमारांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश

Nitish Kumar-नितीशकुमार यांचा मुलगा निशांत (Nishant) यांनी जेडीयूचे सदस्यत्व घेतले आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्यानंतर जेडीयूमध्ये निशांत यांचे 'राज' आले आहे.

Nishant Kumar Join Jdu

Nishant Kumar Join Jdu

Nitish Kumars son Nishant entetrs Politics Joins Jdu: बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे (Jdu) प्रमुख नितीशकुमार हे (Nitish Kumar) हे राज्यसभेवर जाणार आहेत. त्यामुळे जेडीयूचे नेतृत्व कोणाकडे जाणार याचे उत्तर रविवारी मिळाले आहे. कारण नितीशकुमार यांचा मुलगा निशांत (Nishant) यांनी जेडीयूचे सदस्यत्व घेतले आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्यानंतर जेडीयूमध्ये निशांत यांचे ‘राज’ आले आहे. त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

निशांत कुमार जन दल युनायटेडमध्ये (जेडीयू)मध्ये सहभागी झाले आहेत. निशांत कुमार यांनी त्यांचे वडील नितीश कुमार यांच्या राज्यसभेसाठी निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मी त्यांचा निर्णय स्वीकारतो, असे निशांत कुमार यांनी म्हटले आहे. एक सक्रिय सदस्य म्हणून मी पक्षाला पुढे नेण्यासाठी काम करेन. माझ्या वडिलांनी (नितीश कुमार) गेल्या २० वर्षांत केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करेन. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे.” त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना नितीश कुमार यांच्यावरील विश्वास आणि मनोबल कायम ठेवण्याचे आवाहन निशांतकुमार यांनी केले आहे.

या निर्णयामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. निशांत कुमार यांना पक्षात एखादे महत्त्वाचे पद किंवा मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे. ही घटना बिहारच्या राजकारणात एक नवीन वळण ठरणार आहे.


नितीश कुमार दिल्लीला जाणार, एप्रिलमध्ये मुख्यमंत्रीपद सोडणार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेवर जाणार आहे. त्यांनी या पदासाठी उमेदवारीही दाखल केली आहे. एप्रिलपर्यंत ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर मुख्यमंत्रीपदही भाजपकडे जाऊ शकतं.


निशांत कुमार बिहारचा दौरा करणार

पक्षात सामील झाल्यानंतर निशांत कुमार हे आता बिहारचा दौरा करणार आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर बिहारच्या राजकारणात पोकळी निर्माण होईल. ही पोकळी भरून काढण्याची जबाबदारी निशांत कुमार यांच्यावर आहे.

Exit mobile version