RBI Repo Rate : देशात वाढणाऱ्या महागाईत आरबीआयने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक पार पडल्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (RBI Governor Sanjay Malhotra) यांनी शुक्रवारी (5 जून) सकाळी धोरणात्मक व्याजदरांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो दर 5.25 टक्के वरच राहणार आहे. यात कोणताही सध्या बदल करण्यात आलेला नाही.
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर (RBI Repo Rate) हा असा व्याजदर आहे ज्यावर आरबीआय बँकांना अल्प मुदतीसाठी गरज पडल्यास कर्ज देते. जेव्हा एखाद्या बँकेकडे निधीची कमतरता भासते, तेव्हा ती आरबीआयकडून पैसे कर्जाच्या स्वरुपात घेते. ज्या व्याजदरावर रेपो दर बँकांना हे पैसे देते, त्याला ‘रेपो दर’ असे म्हणतात.
— ReserveBankOfIndia (@RBI) June 5, 2026
सचिन घायवळला राजस्थानातून अटक; अनेक महिन्यांपासून होता फरार-
जर रेपो दर वाढला, तर बँकांसाठी कर्ज घेणे महाग होते. याचा परिणाम म्हणून गृहकर्ज, वाहन कर्ज इत्यादींचे दर वाढू शकतात आणि जर रेपो दर कमी झाला, तर बँकांसाठी निधी स्वस्त होतो, ज्यामुळे कर्जे अधिक परवडणारी होऊ शकतात.
