Download App

मोठी बातमी, आधार कार्डबायोमेट्रिक अपडेटसाठी आकारले जाणार नाही शुल्क

Aadhaar Card Biometrics Update : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता लहान मुले आणि किशोरवयीन

  • Written By: Last Updated:

Aadhaar Card Biometrics Update : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सध्या नवीन नोंदणी आणि बायोमेट्रिक अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जात आहे. मात्र शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. नवीन नियमांमध्ये आता 5 ते 7 आणि 15 ते 17 वयोगटातील मुले समाविष्ट असतील.

केंद्र सरकारने मुलांचे आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता बायोमेट्रिक अपडेट (Biometrics Update) अनिवार्य आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रे लिहिण्यात आली आहेत, ज्यात त्यांना अपडेट्स त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर दगडफेक

आधार बायोमेट्रिक्स कसे अपडेट करायचे

सर्वप्रथम, तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या. तुम्ही ते UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा mAadhaar मोबाईल अ‍ॅप्लिकेशन वापरून शोधू शकता. एक फॉर्म मिळवा. केंद्रातून आधार नोंदणी आणि अपडेट फॉर्म मिळवा आणि तो भरा. केंद्रात फॉर्म सबमिट करा. तसेच, तुमचा बायोमेट्रिक डेटा सबमिट करा. केंद्र ऑपरेटर प्रमाणीकरणासाठी फिंगरप्रिंट स्कॅन, आयरिस स्कॅन किंवा दोन्ही करेल.

follow us