अवघ्या दोन मिनिटांत पाणी, बायोमेट्रिकही खराब?, विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचा खुलासा

अवघ्या दोन मिनिटांत पाणी, बायोमेट्रिकही खराब?, विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रत्यक्षदर्शींचा खुलासा

Delhi Rains : राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार (Delhi Rains) पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील (Rajendra Nagar) आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू (Delhi Heavy Rains) झाला. या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस सुरू असताना ही (UPSC) घटना घडली तरी कशी? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे. घटनेच्या चौकशीतून सत्य बाहेर येईलच पण येथे जे प्रत्यक्षात हजर होते त्यांनी ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली असावी याच अंदाज व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेनंतर राजकारण सुरू झालं आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि विरोधी पक्ष भाजप एकमेकांवर (BJP) आरोप करत आहेत. याच दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी मोठा खुलासा केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांकडे मोठा खुलासा केला. राव आयएएस सेंटरच्या तळघरात (बेसमेंट) बायोमेट्रीक सिस्टीम आहे. बायोमेट्रीकमध्ये अंगठा दिल्याशिवाय कुणालाही बाहेर जाता येत नाही. पाण्यामुळे बायोमेट्रीक मशीन खराब झाली असावी. यामुळे कुणालाच येथून बाहेर पडता आलं नाही अशी शक्यता वाटते. या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार आहे. येथील आमदार आणि खासदार आता फक्त एकमेकांवर आरोप लावण्याचे काम करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दिल्लीत मुसळधार! IAS सेंटरच्या तळघरात पाणी; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

अवघ्या दोन मिनिटांत होत्याच नव्हतं

राजधानी दिल्लीत शनिवारी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. या पावसामुळे शहरातील ओल्ड राजेंद्रनगर भागातील आयएएस स्टडी सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. यामध्ये काही विद्यार्थी अडकले होते. प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन विभागाने मदतकार्य केले. काही जणांना वाचवले गेले पण तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत. घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांत केरळचा एक युवक आहे. नेविन डाल्विन असं त्यांचं नाव होतं. आठ महिन्यांपासून तो येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सकाळी दहा वाजता लायब्ररीत अभ्यासासाठी गेला होता. तान्या सोनी, श्रेया यादव या दोघीही या घटनेत मयत झाल्या आहेत.

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर अपघात; छत कोसळल्याने सहाजण जखमी, वाहनांचं नुकसान

तळघरात लायब्ररी अन्..

तळघरात एक लायब्ररी होती अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. येथे अचानक पाणी भरू लागलं. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास येथून बाहेर पडत असतानाच अचानक पाणी आलं. लायब्ररी रिकामी होईपर्यंत गुडघ्याइतकं पाणी साचलं होतं. पाण्याचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे पायऱ्या चढता आल्या नाहीत. अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच संपूर्ण बेसमेंटमध्ये पाणी भरलं. येथे जवळपास दहा ते बारा फूट पाणी होतं. पाणी खूप गढूळ असल्यानं पाण्यात काहीच दिसत नव्हतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube