अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांचा पत्ता कट; भाजपकडून नव्या टीमची घोषणा

आगामी निवडणुका आणि बदलते डिजिटल राजकारण लक्षात घेता सोशल मीडिया नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

News Photo   2026 08 17T165319.888

अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांचा पत्त कट; भाजपकडून नव्या टीमची घोषणा

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय (BJP) पातळीवरील संघटनात्मक फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या बदलांमध्ये पक्षाच्या सोशल मीडिया व्यवस्थेतही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. अमित मालवीय यांच्याकडील सोशल मीडिया कन्व्हेनरची जबाबदारी काढून ती दीपक म्हस्के यांच्याकडं सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या डिजिटल प्रचारयंत्रणेत हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. अमित मालवीय हे दीर्घकाळ भाजपच्या माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यंत्रणेतील प्रमुख चेहरा राहिले आहेत.

या फेरबदलांत भाजपच्या सोशल मीडिया टीममध्येही विस्तार करण्यात आला आहे. विविध राज्यांमधून चार नव्या सोशल मीडिया समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका आणि बदलते डिजिटल राजकारण लक्षात घेता सोशल मीडिया नेटवर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या प्रचारात सोशल मीडिया, डिजिटल कंटेंट आणि ऑनलाइन जनमतनिर्मितीला गेल्या काही वर्षांत मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, या पार्श्वभूमीवर नव्या टीमकडे विशेष जबाबदारी असणार आहे.

नितीन नबीन यांच्या नव्या टीमची घोषणा, भारती पवार, तावडे कुणा-कुणाला संधी

दरम्यान, भाजपने राष्ट्रीय पातळीवर १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. या यादीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्यासह राम माधव यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत अनुभवी नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देतानाच विविध राज्यांतील नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर स्थान देण्याचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून दिसून येतो. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या रचनेत संघटनात्मक अनुभव आणि निवडणूक व्यवस्थापनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भाजपच्या या संघटनात्मक फेरबदलाकडे आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. विशेषतः डिजिटल माध्यमांवरील पक्षाची उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी सोशल मीडिया टीममध्ये करण्यात आलेले बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. अमित मालवीय यांची भूमिका बदलल्यानंतर डिजिटल प्रचाराची धुरा दीपक म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली कशी पुढे नेली जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या नव्या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या संघटनात्मक रचनेलाही नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Exit mobile version