Akbaruddin Owaisi Threatens Cop : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) नेते आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी मंगळवारी (दि. 21) भरसभेत एका पोलीस अधिकाऱ्याला उघडपणे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. येत्या 30 नोव्हेंहर रोजी येथे विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार आणि सभा घेतल्या जात आहे. यावेळी आयोजित एका सभेत उघडपणे धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. आचारसंहितेचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ही धमकी देण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशीचा तिढा सुटला! पाच मागण्या मान्य केल्यानंतरच फडणवीसांना मिळाली परवानगी
नेमकं काय घडलं?
येत्या 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणातील विधानसेभेच्या 40 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी विविध प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. काल संध्याकाळी हैद्राबादच्या ललिताबाग परिसरात अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रात्री दहापर्यंतची वेळ देण्यात आली होती. यावेळी सभेसाठी देण्यात आलेली वेळ संपत आली आहे. त्यामुळे उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने अकबरुद्दीन ओवेसी यांना भाषण आटोपते घेण्याची सूचना केली. त्यावर अकबरुद्दीन ओवेसी यांनी भरसभेत अधिकाऱ्याला धमकी दिली.
काय म्हणाले अकबरुद्दीन ओवेसी?
ज्यावेळी सभेची वेळ संपत आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने अकबरुद्दीन ओवेसी यांना निदर्शनास आणून दिले. त्यावेळी अकबरुद्दीन ओवेसी यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी भरसभेत थेट संबंधित पोलीस अधिकाऱ्याला धमकी देत तेथून निघून जाण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर, रात्रीचे दहा वाजण्यास अद्याप पाच मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळे तुम्ही येथून जाऊ शकता असे म्हणत मी अजून पाच मिनिटे भाषण करेल मला कुणी रोखू शकत नाही असे सुनावले.
ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर ‘ब्लेम गेम’
एवढ्यावर शांत बसतील ते अकबरुद्दीन ओवेसी कसले. पुढे धमकी वजा इशारा देत अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्यांनी लोकांना संबोधून विचारलं की, मी बरोबर बोललो ना? जर मी इशारा दिला तर तुम्हाला इथून जावं लागेल की आम्ही तुम्हाला पळवू? आम्हाला कमजोर करण्यासाठी हे लोक इथे येत असतात असेही अकबरुद्दीन म्हणाले.
#WATCH | Telangana: AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector who was on duty and asked him to leave the spot while he was addressing a campaign in Lalitabagh, Hyderabad yesterday. The police inspector asked him to conclude the meeting on time as per the Model… pic.twitter.com/rf2tJAOk3b
— ANI (@ANI) November 22, 2023