सावधान! पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न करताय मग, पोलीस संरक्षण नाहीच; हायकोर्टाचा निकाल

इलाहाबाद हायकोर्टाचे म्हणणं आहे की पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करणाऱ्या प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करु शकत नाहीत.

Marriage

Marriage

Uttar Pradesh News : आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी धक्का देणारी बातमी आहे. इलाहाबाद हायकोर्टाचे (Uttar Pradesh) म्हणणं आहे की पालकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न करणाऱ्या प्रेमी जोडपे पोलीस सुरक्षेचा दावा करु शकत नाहीत. अशा जोडप्यांच्या जीवन आणि स्वातंत्र्याला धोका पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस सुरक्षेचा (Police Protection) दावा करु शकत नाही.

न्या. सौरभ श्रीवास्तव यांनी एका जोडप्याकडून करण्यात आलेल्या पोलीस सुरक्षेच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. हायकोर्टाने सांगितले की आपल्या इच्छेने विवाह करणाऱ्या जोडप्यांना पोलीस सुरक्षेचा अधिकार नाही. जोडप्यांच्या जीवनाला काही धोका उत्पन्न झाला तर अशाच प्रकरणात पोलीस सुरक्षा देता येऊ शकेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निकालाने आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना धक्का बसला आहे.

जर अशा जोडप्यांना कोणत्याच प्रकारचा धोका नसेल तर त्यांना एकमेकांना पाठिंबा देत समाजाचा सामना केला पाहीजे. या याचिकेत कोर्टाने कागदगपत्रे आणि वक्तव्यांची तपासणी केली असता जोडप्याला कोणत्याच प्रकारचा धोका नसल्याची बाब समोर आली. जोडप्याने न्यायालयात याचिका दाखल करत दावा केला होता की त्यांच्या घरच्यांकडून त्यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप केला जात आहे. परंतु, न्यायालयाने चौकशी करत या प्रकरणी महत्वाचा निकाल दिला. हा निर्णय पालकांच्या परवानगीविना विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

न्यायमूर्तींच्या बंगल्याला आग काय लागली, नोटांचं घबाडच सापडलं; न्यायपालिकेला बसला हादरा..

Exit mobile version