Download App

हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, 5 दिवसांची ईडी कोठडी

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीने एमपीएमएलए कोर्टाकडे (MPMLA Court) त्यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यापूर्वी हेमंत सोरेन यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने अटक केली होती. चौकशीला समोरे जाण्यापूर्वी सोरेन यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

अटकेनंतर सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणीसाठी न्यायालयाने 2 फेब्रुवारीची तारीख दिली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना या प्रकरणी थेट सुप्रीम कोर्टात का आले, असा सवाल केला. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हेमंत सोरेन यांच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सांगितले की, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे. त्यामुळे आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत.

Canada : खलिस्तानी हरदीप निज्जरच्या समर्थकांच्या घरावर गोळीबार, भारत-कॅनडा पुन्हा भिडणार?

यावर नाराजी व्यक्त करताना न्यायालयाने सांगितले की, नियम सर्वांसाठी समान आहेत. जर तुम्ही हे एकासाठी केले तर तुम्हाला ते सर्वांसाठी करावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने सोरेन यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

‘ईडी कारवाई भविष्यात परवडणारी नाही’; राज ठाकरेंचा भाजपला थेट इशारा

चंपाई सोरेन यांनी घेतली शपथ
चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जेएमएमचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांच्याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही शुक्रवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.

Mumbai Congress : ‘आम्ही काँग्रेसमध्येच, कुठेही जाणार नाही’; ‘राष्ट्रवादी’ प्रवेशाच्या चर्चांना सिद्दीकींचा फुलस्टॉप!

शपथविधी सोहळ्यानंतर काही वेळातच झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीचे आमदार हैदराबादला रवाना झाले आहेत. राज्यपालांनी चंपाई सोरेन यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.

follow us