Download App

विशेषाधिकार भंगप्रकरणी राहुल गांधींना नोटीस, राहुल गांधी काय उत्तर देणार?

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : अदानी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी 7 फेब्रवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील (Addresses of the President) धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत हल्लाबोल केला होता. त्यामुळे राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने (Lok Sabha Secretariat) नोटीस बजावली आहे. या नोटीसीला 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सचिवालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

मोदींविरोधात खोटी, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारी तथ्ये ठेवल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर ठेऊन त्यांना विशेषाधिकार भंग नोटीस बजविण्यात आली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या विशेषाधिकार भंग केल्याच्या नोटीसवर लोकसभा सचिवालयानं उत्तर मागितले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारत आरोप केले होते. त्यानंतर भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली होती.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदींबद्दल चुकीचे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे मुद्दे मांडल्याचा दावा भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला होता. त्यासंदर्भात भाजप खासदारांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या भाषणावर विशेषाधिकार भंगाची नोटीस जारी केली होती. तर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून नियम ३८० नुसार राहुल गांधी यांच्या भाषणातील असंसदीय, असन्माननीय आरोप लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

Pathan : शाहरुखच्या पठानने गाठला 950 कोटींचा टप्पा !</a
>

दरम्यान, आता लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवानी राहुल गांधी यांना ईमेलवर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे

 

 

Tags

follow us