Download App

Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने वाढवलं अदानींचं टेन्शन; आरोप फेटाळत दिलं स्पष्टीकरण

Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने ( OCCRP Report) अदानींचं टेन्शन वाढंवलं आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टने अदानी समुह आणि गौतम अदानी यांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता आणखी एका रिपोर्टने अदानींचं टेन्शन वाढवलं आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ( OCCRP Report) यांनी हा रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये अदानींवर गंभार आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर लगेचच अदानी समुहाचे शेअर्स कोसळले आहेत. मात्र त्यावर लगेचच अदानींकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे.

Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स अन् अ‍ॅक्शन सीन्स; किंग खानचा धमाकेदार ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

काय आहे OCCRP Report?

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट OCCRP Report) ने गुरूवारी हा रिपोर्ट जारी केला. या रिपोर्ट्सनुसार अदानी समुहाच्या काही सार्वजनिक स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अप्रत्यक्षपणे मॉरिशस फंडच्या माध्यमातून लाखो डॉलर्स गुंतवण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात ते अदानी कुटुंबीयांचीच भागीदारी आहे. हा रिपोर्ट अदानी समुहाच्या मेल्सवरून फाईल्सच्या अभ्यासाच्या आधारे तयार करण्यात आला आहे.

Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!

अदानींनी दिलं स्पष्टीकरण…

अदानी समुहाने ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ( OCCRP Report) यांनी केलेले सर्व आरोप फोटाळुन लावले आहेत. ते म्हणाले की, शेअर्स पाडून नफा कमावण्याचा आणि आमची बदनामी करण्याचं हे सोरोस यांच्या फंडिंगमधून चाललेल्या गटाचे हे षडयंत्र आहे. त,ेच त्यासाठी विदेशी माध्यमांचा वापर केला जात आहे. आम्ही हे आरोप स्पष्टपणे नाकारतो. यातून हिंडेनबर्गला पुन्हा आणण्याचा प्रत्न केला जात आहे. असं अदानी समुहाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच OCCRP ने केलेल्या आरोपांनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यावर अदानी समूहाकडून खंडन करण्यात आल्यानंतर शेअर्स खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. या रिपोर्टनंतर अदानी पॉवरचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरल्याचे पाहण्यास मिळाले.

Tags

follow us