Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!

  • Written By: Published:
Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!

नवी दिल्ली :  काही दिवसांपूर्वी अडाणी समुहाशी (Adani Group) संबंधित एक रिपोर्ट हिंडेनबर्गने सादर केला होता. त्यानंतर आता OCCRP म्हणजेच एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर पुन्हा खळबळ उडाली असून, हा रिपोर्ट समोर येताच तीन तासात अदाणी समूहाचे 35 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. (Who Is OCCRP )

INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत

अदानी समुहाचे शेअर्स गडगडले

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट म्हणजेच OCCRP ने केलेल्या आरोपांनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. करण्यात आलेल्या आरोपांवर अदानी समूहाकडून खंडन करण्यात आले आहे त्यानंतरदेखील अदानी समुहाच्या शेअर्स खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. या रिपोर्टनंतर अदानी पॉवरचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरल्याचे पाहण्यास मिळाले.

तर दुसरीकडे, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 2.50 टक्‍क्‍यांनी घसरले असून, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस 2.25 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. अदानी समूहाच्या सर्व 10सूचिबद्ध कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे कंपनीच्या एकूण मार्कटकॅपमध्ये 35624 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मार्केट बंद होईपर्यंत अदानी समुहाचे मार्केट कॅप 10,84,668.73 कोटी रुपये होते, जे आज 10,49,044.72 कोटी रुपयांवर आले आहे.

Adani OCCRP Report : आणखी एका रिपोर्टने वाढवलं अदानींचं टेन्शन; आरोप फेटाळत दिलं स्पष्टीकरण

OCCRP कोण?

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) हे शोध पत्रकारांचे जागतिक नेटवर्क आहे. OCCRP ची स्थापना 2006 मध्ये झाली असून, OCCRP ची स्थापना आशिया, युरोप, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत पसरलेल्या 24 ना-नफा असलेल्यांकडून करण्यात आली आहे. OCCRB ला अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरॉस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांसारख्या लोकांकडून निधी प्राप्त होतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉर्ज सोरोस हे मोदी सरकारचे कट्टर विरोधक मानले जातात. जॉर्ज त्यांच्या संस्था, ओपन सोसायटी फाउंडेशनद्वारे OCCRP ला निधी देतात. याशिवाय समूहाला फोर्ड फाऊंडेशन, रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि ओक फाऊंडेशनकडूनही निधी मिळतो.

‘फाईल्स व्हाया फडणवीस जाणे म्हणजे अजितदादांचे पंख छाटणे नव्हे तर, बळ देण्यासारखे’

वाद अन् जॉर्ज यांचा वादांशी जुना संबंध

अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा दीर्घकाळ वादांशी संबंध आहे. ते यापूर्वीही पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधाने करत आले आहेत. जॉर्ज यांनी केवळ पीएम मोदींविरोधातच गरळ ओकलेली नाही तर, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही वादग्रस्त विधाने केली आहेत. सोरॉन यांच्यावर वेगवेगळ्या देशांच्या राजकारण आणि व्यवसायांवर प्रभाव टाकण्यासाठी आपल्या संपत्तीचा गौरवापर केल्याचे आरोपही लावण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube