‘फाईल्स व्हाया फडणवीस जाणे म्हणजे अजितदादांचे पंख छाटणे नव्हे तर, बळ देण्यासारखे’

  • Written By: Published:
‘फाईल्स व्हाया फडणवीस जाणे म्हणजे अजितदादांचे पंख छाटणे नव्हे तर, बळ देण्यासारखे’

मुंबई : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. या नव्या खेळीनुसार आता अजित पवारांकडून निघणाऱ्या फाईल्स थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे न जात त्या व्हाया फडणवीस यांच्या मार्फेत शिंदेंकडे पाठवल्या जाणार आहेत. मुख्य सचिवांनी सर्व विभागांच्या सचिवांना तसे लेख निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे आता फडवीसांनी दादांचे पंख झाटण्यास सुरूवात केल्याची चर्चा मंत्रालयाच्या दरबारी रंगली आहे. फाईल्स व्हाया फडणवीस शिंदेंकडे जाणे म्हणजे अजितदादांचे पंख छाटणे नव्हे तर, बळ देण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे.

INDIA Meeting : पवारांकडे ‘इंडिया’ची धुरा येणार? मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ऐनवेळी नाव चर्चेत

सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर आता शिंदेंनी चाप बसवत अजितदादांकडून येणाऱ्या सर्व फाईल्स व्हाया फडणवीसांकडून आपल्याकडे येतील असे आदेश दिले आहेत. हे निर्देश जरी शिंदेंनी मुख्य सचिवांना दिले असले तरी, या निर्णयामागे फडणवीसांची खेळी असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली असून, यावरून आता ट्रिपल इंजिन सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येऊ लागले आहे.

विरोधकांनी संधी साधली

दरम्यान, अजितदादांच्या सर्व फाईल्स व्हाया फडणवीसांकडून शिंदेंकडे जाणार असल्याने हे एकप्रकारे दादांचे पंख छाटण्यासारखे असल्याचे म्हणत विरोधकांनी टीका करण्याची संधी साधली आहे. अजित पवारांच्या दादागिरीवर वचक बसावा म्हणून ठाण्याच्या भाईंनी मैदानात उतरत असे निर्देश दिल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.

local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य टांगणीला; निवडणुकीबाबतची सुनावणी पुढे ढकलली

बावनकुळेंकडून बचाव

शिंदेंच्या या निर्णयानंतर एकीकडे विरोधकांकडून टीका केली जात असताना मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी याबाबत बचाव घेण्याची भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, फडणवीसांनी घेतलेले निर्णय अजितदादांना माहिती असले पाहिजे. तसेच अजितदादांना घेत असलेले निर्णय सर्वांना माहिती असले पाहिजे. त्यामुळे जे काही निर्देश देण्यात आले आहेत त्यात काही चुकीचे नसून सरकार तिघांचे आहे त्यामुळे यात कुठे पंख छाटण्यात आले आहेत असा प्रश्न बावनकुळेंनी वडेट्टीवारांच्या टीकेवर उपस्थित केला आहे.

तिन्ही नेत्यांना एकमेकांचे निर्णय माहीत असले पाहिजे, निर्णय घेताना कळले पाहिजे. एखादा निर्णय एकाने घेण्यापेक्षा चार लोकांनी घेतलेले निर्णय अधिक प्रभावी असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाठी हा महत्वाचा निर्णय असून त्या निर्णयाचे स्वागत करतो. एखाद्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयात दुसरा नेता आणखी एडिशन करून त्या निर्णयाची ताकद वाढवेल असेही बावनकुळेंनी म्हटले आहे.

Sachin Tendulkar च्या घराबाहेर ऑनलाईन गेम जाहिरात प्रकरणी आंदोलन; बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात

अजितदादांना बळ मिळेल

शिंदेंच्या या निर्णयामुळे अजित पवारांचे कोणतेही पंख छाटण्यात आलेले नसून, यामुळे उलटं त्यांना बळ मिळेल असे बावनकुळेंनी म्हटले आहे. पाच वर्ष फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे फाईल त्यांच्या मार्फेत शिंदेंकडे जाणे हे एकप्रकारे राज्याच्या विकासाच्यादृष्टीने एकप्रकारे अॅडिशन आहे.

ठाकरेंना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागलेत 

यावेळी बावनकुळेंनी पंतप्रधानपदाचे उद्धव ठाकरेंना डोहाळे लागल्याची टीका केली आहे. तसेच ते कुठून लोकसभा लढणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विरोधकांच्या इंडियामध्ये एकमत होणार नसून ठिणगी पडेल आणि सर्व वेगळे होतील. पवारांच्या नावाची संयोजक म्हणून चर्चा सुरू आहे. मात्र, कुणीही संयोजक झालं तरी काही होणार नाही. हे त्या डबक्यात कुदतील आणि त्या डब्यात राहतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube