Download App

सरकारचा ऐतिहासिक निर्णय! महिला कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची Maternity Leave

सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

180 days Maternity Leave : राज्यातील सरकारांकडून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. विविध कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांत (Maternity Leave) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही निर्णय घेतले जातात. सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ओडिशाातील भाजप सरकारने (Odisah Goveenment) महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 180 दिवसांची मातृत्व रजा (Maternity Leave) देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य सरकारने एक अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यात या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.

धक्कादायक! जेवणाच्या भाजीत पाल, तीच भाजी लोकांच्या पोटात; भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा

या निर्णयाची माहिती देताना ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही महिलांना सशक्त करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबाला जास्त वेळ देता यावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारच्या अर्थ विभागाने गुरुवारी रात्री या निर्णयाबाबत अधिसूचना जारी केली. यानुसार महिला कर्मचारी 180 दिवसांची सुट्टी घेऊ शकतात. तर पुरुष कर्मचारी 15 दिवसांची पितृत्व रजा घेऊ शकतील. सरोगेट माता आणि कमिशनिंग माता पित्यांना या निर्णयाचा लाभ घेता येईल. केंद्र सरकारने सरोगसीद्वारे माता पिता बनणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मातृत्व आणि पितृत्व रजा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या गोष्टी काय

सरोगसीचा पर्याय घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची मातृत्व रजा मिळेल.
सरोगसीच्या माध्यमातून कमिशनिंग पिता होण्यासाठी पुरूष कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची रजा
सरोगेट माता आणि कमिशनिंग माता दोन्हींसाठी रजेचा नियम लागू राहणार
या निर्णयास पात्र होण्यासाठी माता पित्यांकडे किमान दोन मुले असावीत.
सरोगसी करार आणि मेडिकल रेकॉर्डसहीत महत्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता राहिल.

यामध्ये असेही म्हटले आहे की राज्य सरकारमधील कोणतीही महिला कर्मचारी जिचे दोन मुले असतील आणि ती जर सरोगसीच्या माध्यमातून माता बनली असेल तर सहा महिन्यांची रजा घेता येईल. यांसह आणखी काही महत्वाच्या अटी या अधिसूचनेत देण्यात आल्या आहेत. या अटी आणि तरतुदींचे पालन करून राज्य सरकारच्या निर्णयाचा महिला कर्मचाऱ्यांना लाभ घेता येईल.

सरपंच ते मुख्यमंत्री, जाणून घ्या ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन माझी यांचा राजकीय प्रवास

follow us