धक्कादायक! जेवणाच्या भाजीत पाल, तीच भाजी लोकांच्या पोटात; भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा

धक्कादायक! जेवणाच्या भाजीत पाल, तीच भाजी लोकांच्या पोटात; भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा

Bhandara News : राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच भंडारा जिल्ह्यातून (Bhandara News) अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. जिल्ह्यातील जांभोरा या गावात साक्षगंधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील भोजनासाठी तयार करण्यात आलेल्या भाजीत पाल पडली होती. हीच भाजी नंतर अनावधानाने ग्रामस्थांनी खाल्ली. त्यामुळे तब्बल 51 लोकांना विषबाधा झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

बिस्कीटातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा; 7 जणांची प्रकृती गंभीर, छत्रपती संभाजीनगरला हलवलं

जांभोरा गावातील एका मुलीचं विवाह जमला होता. त्यानिमित्त साक्षगंधचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गावातील लोकही जमले होते. या कार्यक्रमासाठी जेवणही तयार करण्यात आले होते. याच दरम्यान जेवणाच्या भाजीत पडली. मात्र याबाबत कल्पना नसल्याने तीच भाजी गावकऱ्यांना जेवणासाठी वाढण्यात आली. लोकांनीही भाजी खाल्ली.

नंतर मात्र या भाजीमुळे 51 जणांना त्रास होऊ लागला. अनेकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाकीच्या लोकांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही जणांवर जांभोरा येथील आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या लोकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून या नागरिकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एनपीएस वात्सल्य योजना आहे तरी काय? मुलांच्या भविष्याची काळजीच मिटेल; जाणून घ्या, सर्वकाही..  

दरम्यान, याआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात समोर आली होती. यामध्ये विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा 257 वर गेला होता. (Sambhajinagar) त्यातील सात विद्यार्थ्यांची तब्येत खालावली होती. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube