Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या 3 रेल्वेच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी प्रवाशांचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली असून जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयागाचे चंद्रपूरच्या कलेक्टरला पत्र, पोटनिवडूक लागण्याची शक्यता
काल रात्रीच्या सुमारास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या घटनेची पाहणी केली आहे. अपघातानंतर अद्यापर्यंत मदत यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे. रेल्वेचा पत्रा चिरुन बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता ही घटना घडली.
राजस्थान काँग्रेसमध्ये खळबळ! सचिन पायलट अखेर ‘तो’ निर्णय घेण्याच्या तयारीत
बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली.
आमचा पगार बुडविला ! भाजपचे माजी खासदार अमर साबळेंवर गंभीर आरोप
अपघातानंतर या मार्गावरील 48 रेल्वेगाड्या रद्द केल्या. 39 रेल्वेगाड्या वळवून दुसऱ्या मार्गाने वळविल्या. चेन्नई-हावडा मेल, दरभंगा-कन्याकुमारी एक्स्प्रेस, कामाख्या-एलटीटी एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या.
CM Eknath Shinde : केंद्र सरकारसाठी शिंदे सरकारचे 14 हजार झाडांच्या कत्तलीचे आदेश!
याशिवाय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. या दुर्घटनेवर जगभरातील अनेक नेत्यांनी दुख: व्यक्त केलं असून यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने रक्तदान करीत आहेत.