पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयागाचे चंद्रपूरच्या कलेक्टरला पत्र, पोटनिवडूक लागण्याची शक्यता

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (70)

Possibility of by-elections soon for 2 vacant Lok Sabha seats in the state: एका महिन्यापूर्वी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यानंतर ३० मे रोजी चंद्रपुरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या राज्यातील लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर आता धानोरकर आणि बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रामुळे या मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासह चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. नजीकच्या काळात पोटनिवडणूक झाल्यास तुमच्याकडे पुरेसे निवडणूक साहित्य आहे का, अशी विचारणा केली. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता पाहता निवडणुकीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच या पत्रात, तात्काळ पुनरावलोकन करून आवश्यक साहित्याची मागणी करण्याची सूचना केली आहे.

Odisha Train Accident : ‘आपत्ती व्यवस्थापन’ ची जबाबदारी नगरच्या अधिकाऱ्याकडे

दरम्यान, पुणे लोकसभेसाठी सर्वच पक्षांच्या वतीने अनेक नावांची चर्चा सुरू आहे. पुणे लोकसभा जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. अशा स्थितीत ही जागा कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाही नेत्याच्या नावाची चर्चा नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube