Odisha Train Accident : ‘आपत्ती व्यवस्थापन’ ची जबाबदारी नगरच्या अधिकाऱ्याकडे

  • Written By: Published:
Odisha Train Accident : ‘आपत्ती व्यवस्थापन’ ची जबाबदारी नगरच्या अधिकाऱ्याकडे

Odisha Train Accident : ओडिसा राज्यामधील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) सायंकाळीत साडेसातच्या सुमारास तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचे मृत्यू देह आढळून आले आहेत, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या घटनेच्या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते नगर जिल्ह्याचे रहिवासी आहेत.

देशातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनचे अनेक डबे उद्ध्वस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) घटनास्थळी भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी शिंदे यांच्याशी दीर्घ चर्चा करून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी शिंदे यांनी घटनेनंतर त्वरित जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचे काम हाती घेतले आहे. जिल्हाधिकारी शिंदे हे पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी आहेत. त्यांनी कोरोना संकट काळ व अम्फान चक्री वादळातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत भरीव कार्य केले होते.

‘एमएमआरडीए’वर मुख्यमंत्र्यांचा वरचष्मा; आयुक्तपदी संजय मुखर्जी यांची नियुक्ती

यावेळी मोदींनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत संपूर्ण देशाची सहानुभूती असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांचा जीव कसा वाचवला जाईल हे सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. या घटनेत अनेक राज्यांतील प्रवाशांचे काही ना काही नुकसान झाले असून, मन अस्वस्थ करणारी ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या घटनेत जे नागरिक जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांसाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही असा विश्वास देत या संपूर्ण घटनेची सखोली चौकशी केली जाईल, तसेच ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी मोदींनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व धर्मेंद्र प्रधान हे दोघे उपस्थित होते. यानंतर त्यांनी बालेश्वर सदर रुग्णालय आणि कटक एससीबी मेडिकल कॉलेजलाही भेट देत रुग्णांची विचारपूस केली.

WhatsApp Image 2023 06 03 At 8.28.34 PM 1

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube