Download App

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे चकमक झाली. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Written By: Last Updated:

Jammu and Kashmir : पाकिस्तानचा कट आज सुरक्षा दलांनी उधळून लावला. त्यांच्याकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. जम्मू- काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत रायफलमॅन मोहित राठोड हे हुतात्मा झाले तर एका मेजर समवेत चार जवान हे जखमी झाले आहेत. ही चकमक माछील सेक्टरच्या जवळ असलेल्या जंगलात झाली. भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे.

भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी, दुसरा दिवस ठरणार ऐतिहासिक? वाचा, आजचं वेळापत्रक

पाकिस्तानची ‘बॉर्डर अॅक्शन फोर्स’ (बॅट) या परिसरामध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याचा प्रयत्न करत होती, अशी माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कुपवाडाच्या कमकारी भागामध्ये सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. हे दहशतवादी समोर येताच चकमकीला तोंड फुटले. या चकमकीनंतर काही दहशतवाद्यांनी जंगलामध्ये पलायन केल्याचं बोललं जातय. सध्या या भागामध्ये लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. कारगिल विजय दिनाला २६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये विविध ठिकाणांवर कार्यक्रमांचे आयोजन केलं जात होते. त्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाला आहे.

संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध

डेसाच्या डोंगराळ भागामध्ये फिरणाऱ्या काही संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे डोडा पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याच भागामध्ये १५ जुलै रोजी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन आणि पोलिस कर्मचाऱ्यांसह पाच जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यामध्ये याच संशयित दहशतवाद्यांचा हात असल्याचे समजते.

ओडिशातील तुकड्या जम्मूत 

सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी

जम्मू- काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दोन तुकड्या या ओडिशातून जम्मूला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या तुकड्यांमध्ये दोन हजारांपेक्षाही अधिक जवान आहेत. या जवानांना सांबा आणि जम्मू-पंजाब सीमेवर तैनात करण्यात आले आहे. दिल्ली आणि जम्मूमध्ये लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला.

follow us