Download App

Video : भारताने पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ का केला?, संयुक्त पत्रकार परिषदेत दिली A टू Z माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारताने आज जबाबदारीने ही कारवाई केली आहे.

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तामधील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले आहेत. त्यानंतर विदेश सचिव विक्रम मिसरी यांच्याकडून या हल्ल्याबद्दल माहिती देण्यात आली. (Sindoor) ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतात मोठा आक्रोश होता. तो आजही कायम आहे. पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलण्याची गरज होती. भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून प्रतिउत्तर दिलं आहे. भारताने आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. यातील हल्लेखोरांना न्यायाच्या कक्षेत आणावं अस भारताचं मत आहे असं मिसरी म्हणाले आहेत.

Live : ऑपरेशन सिंदूर! निष्पाप नागरिकांची काळजी घेण्यात आली : कर्नल सोफिया कुरेशी

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. भारताने आज जबाबदारीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानातून भारतात आणखी हल्ले होऊ शकतात अशी गुप्त माहिती आहे असंही मिसरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. काश्मिरमधील विकास थांबवण्यासाठी हा पहलगाममधील हल्ला घडला होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

ऑपरेश सिंदूर पहलगाम हल्ल्यातील पीडितांच्या न्यायासाठी करण्याता आला. आतंकवाद संपवण्यासाठी हे पाऊल उचललं. दरम्यान, या हल्ल्यात कोणत्याही नागरी वस्तीला धक्का बसेल असं कृत्य केलं नाही. या कारवाईत फक्त दहशतवादी स्थळांना केलं आहे अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.

follow us