Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी भारताने पाकवर कोणत्या कारवाया केल्या; वाचा यादी

  • Written By: Published:
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी भारताने पाकवर कोणत्या कारवाया केल्या; वाचा यादी

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत बदला घेतला आहे. ७ मे २०२५ रोजी केलेल्या या कारवाईत भारताने पीओकेमधील मुरीदके, कोटली, मुझफ्फराबाद आणि बहावलपूर या दहशतवादी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, या 9 भागातील भारतीय लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे तळ हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही पहिलीच घटना नाही, तर ऑपरेशन सिंदूरपूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानविरूद्ध कोण-कोणत्या कारवाया केल्या आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Operation Sindoor : फक्त 25 मिनिटांत पाकचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं सगळं सांगितलं

ऑपरेशन विजय

कारगिल टेकड्या शत्रूपासून मुक्त करण्यासाठी भारतीय सैन्याने २६ मे १९९९ रोजी ऑपरेशन विजय सुरू केले. दोन्ही देशांमध्ये सुमारे २ महिने युद्ध चालले आणि १४ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे घोषित केले.

ऑपरेशन मेघदूत

१३ एप्रिल १९८४ रोजी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन मेघदूत सुरू केले. या ऑपरेशनचा उद्देश जगातील सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर नियंत्रण स्थापित करणे होता.

ऑपरेशन पराक्रम

२००१ मध्ये संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, लष्कराने डिसेंबरमध्ये ऑपरेशन पराक्रम सुरू केले. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले नसले तरी भारत-पाकिस्तान सीमेवर हजारो सैनिक तैनात होते.

सर्जिकल स्ट्राईक

२८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. या कारवाईचा उद्देश पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लाँचपॅड नष्ट करणे होता.

“सिंधूपासून सिंदूरपर्यंत..”15 कठोर निर्णयांनी पाकिस्तानची दमछाक; जाणून घ्या भारताची शौर्यगाथा

बालाकोट हवाई हल्ला

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने प्रत्युत्तर म्हणून बालाकोट हवाई हल्ला केला. ज्यामध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या आत बालाकोटमध्ये घुसून हवाई हल्ला केला होता. त्यानंतर आता भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube