Operation Sindoor : 25 मिनिटांत खेळ खल्लास; ‘त्या’ दोन महिला अधिकाऱ्यांनी फाडला पाकचा चेहरा

Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे मागे पडला आहे. आता भारतीय लष्कराकडून याबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) तसेच दोन महिला अधिकारी उपस्थित होत्या. यामध्ये हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा समावेश आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी त्यांच्या निवेदनात पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला. दहशतवाद्यांना धडा शिकवणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांनीही दहशतवाद्यांबद्दल एक निवेदन (India Pakistan Tension) जारी केलंय. दहशतवाद्यांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे, असं देखील विक्रम मिस्त्री यांनी म्हटलंय. 25 मिनिटांत पाकिस्तानचा खेळ खल्लास, अशी माहिती देखील भारतीय लष्कराने दिली आहे.
भारताचा 25 मिनिटांत 21 ठिकाणांवर हल्ला
ऑपरेशन सिंधूरबद्दल माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय सैन्यानं अवघ्या 25 मिनिटांत 21 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत पाकिस्तानाचा खेळ खल्लास केला. पाकिस्तानवर मध्यरात्री 1:05 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या कारवाईत 9 ठिकाणी हल्ले करण्यात आले. ही कारवाई 1.05 ते 1.30 या 25 मिनिटात करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई गुप्तचर माहितीच्या आधारे करत करण्यात आल्याचेही कुरेशी यांनी सांगितले. सर्वप्रथम, सवाई नाला कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. यात लष्कराने जैश आणि लष्करच्या छावण्यांना लक्ष्य केले. 9 ठिकाणी 21 लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी हल्ला झाला, ते ठिकाण सियालकोट आहे. येथील सरजल छावणीवर हल्ला झाला. इथे हिजबुलची एक छावणी असल्याचेही कुरेशी यांनी सांगितले.
“सिंधूपासून सिंदूरपर्यंत..”15 कठोर निर्णयांनी पाकिस्तानची दमछाक; जाणून घ्या भारताची शौर्यगाथा
विक्रम मिस्री यांनी या हल्ल्याचं वर्णन अत्यंत क्रूर असं केलंय. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी कुटुंबांसमोर गोळीबार केला. हे एक संवेदनशील आणि क्रूर कृत्य होतं. त्यांनी सांगितले की, हा हल्ला टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) ने केला आहे, तो लष्कर-ए-तैयबाशी जोडलेला दहशतवादी गट आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे असलेले संबंध उघड झालेत.
विक्रम मिस्री यांनीही दहशतवाद्यांबद्दल पाकिस्तानच्या वृत्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानने स्वतःला दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवलं आहे. ते आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देण्यात आणि त्यांच्याविरुद्ध खोटा प्रचार करण्यात गुंतलेला आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या जागतिक नेटवर्कला प्रोत्साहन देत आहे. या पत्रकार परिषदेद्वारे भारताने संपूर्ण जगाला संदेश दिला की, पाकिस्तानची भूमिका दहशतवादाच्या आश्रयदात्याची राहिली आहे. भारत त्यांच्याविरुद्ध कारवाई करत राहील. ते म्हणाले की, आज भारताने आपला अधिकार बजावला. आम्ही मोजमापाने कारवाई केली. उत्तर देण्याचा अधिकार वापरला. दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर! पहलगाम हल्ल्याचा बदला, शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून मारलं
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत ९ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार सैनिक शहीद झाले. त्याला पाकिस्तानमधील एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचेही कर्नल सोफिया कुरेशी यांनी यावेळी सांगितले.