Download App

Video : दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, पहलगाम हल्ल्याचा बदला कसा घेतला? लष्करानं केले शेअर व्हिडिओ…

भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली

Operation Sindoor Video: पहलगाम हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, या ऑपरेशनचे व्हिडिओ आता भारतीय सैन्याच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आले.

Video : दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, पहलगाम हल्ल्याचा बदला कसा घेतला? लष्करानं केले शेअर व्हिडिओ…

भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येतंय. या ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याने काही व्हिडिओ शेअर करत हा हल्ला कसा झाला, याची माहिती दिली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांच्या इमारती उद्धवस्त झाल्याची माहिती लष्कारने दिली.

पहिला एअर स्ट्राईक पहाटे १.०४ वाजता हवाई दलाने केला. पहिला स्ट्राइक हल्ला पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील कोटली येथील मरकझ अब्बास या दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आला. या तळाचा वापर लष्कर-ए-तोयबाच्या आत्मघातकी बॉम्बर्सना प्रशिक्षण देण्यासाठी केला जात असे. लष्कराने म्हटले आहे, की येथे ५० हून अधिक दहशतवादी प्रशिक्षणासाठी जमले होते.

सर्वात मोठी बातमी, रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

लष्कराने आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यामध्ये कोटली येथील गुलपूर तळाला लक्ष्य करण्यात आलंय. हा स्ट्राइक पहाटे १.०८ वाजता झाला. नियंत्रण रेषेपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेला लष्कर-ए-तोयबाचा हा तळही हवाई दलाने उद्ध्वस्त केला आहे. एप्रिल २०२३ मध्ये पूंछ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच सैनिक शहीद झाले होते. जून २०२४ मध्ये, एका यात्रेकरू बसवर झालेल्या हल्ल्यात नऊ यात्रेकरू ठार झाले होते. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना गुलपूर कॅम्पमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते.

तिसरा स्ट्राइक नियंत्रण रेषेपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सियालकोटमधील मेहमुना जोया या दहशतवादी तळावर करण्यात आला. हा हल्ला पहाटे दुपारी १.११ वाजता झाला. या कॅम्पमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे लष्कराने म्हटले आहे.

फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला
पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, २३ एप्रिल रोजी भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतही पाकने दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट भारतावच आरोप केला. त्यामुळं भारताने प्रत्युत्तर दिलं. मात्र, आम्ही काळजीपूर्वक विचार करून कारवाई केली आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.
तर भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी दहशतवादी कारवायांचा कणा मोडण्यासाठी आम्ही ही मोहिम राबवली. तसंच जी ठिकाण आम्ही निवडली त्यात सामान्य नागरिकांचा जीव जाणार नाही, कुठल्याही निष्पाप माणसाला मारलं जाणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, याची पूर्णपणे खबरदारी घेतली.

निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे. हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर, बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफसह सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व सैनिकांनी दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे आणि सीमावर्ती भागात जास्तीत जास्त उपस्थिती राखावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेत.

 

follow us