Download App

पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?

अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.

India Strikes in Pakistan : पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पूर्णपणे अलर्ट (India Strikes in Pakistan) मोडवर आहे. भारतीय सैन्याचं म्हणणं (Indian Army) आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरुच आहे. याचा अर्थ असा की भारत (Operation Sindoor) यापुढेही कारवाई करू शकतो. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) अर्धसैनिक दलांच्या डीजीपी बरोबर चर्चा केली. अर्धसैनिक दलांच्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तत्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले.

तर दुसरीकडे माजी लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांचे एक ट्विट चर्चेत आहे. पिक्चर अभी बाकी है असे लिहित त्यांनी सूचक ट्विट केलं आहे. या ऑपरेशन अंतर्गत आणखी काही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानात आणखी हल्ले होऊ शकतात असे सांगितले जात आहे. या ऑपरेशन नंतर सीमावर्ती राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गृहमंत्र्यांच्या बैठकीत सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री, पोलीस महानिदेशक, मुख्य सचिव उपस्थित होते. पाकिस्तानसह नेपाळला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीला हजेरी लावली. नऊ राज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपात्कालीन बैठक झाली.

Video : अचूक ऑपरेशन अन् हनुमानाचा आदर्श; ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह काय म्हणाले?

पीएम मोदींकडून विदेश दौरा रद्द

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी त्यांचा तीन दिवसांचा परदेश दौरा स्थगित केला आहे. पीएम मोदी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, देशातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी या दौऱ्यावर जाणे टाळले आहे. पंतप्रधान मोदी सातत्याने माहिती घेत आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईवर त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले.

पाकिस्तानातही वेगवान हालचाली

भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) दणक्यात बदला आहे. बळकट सुरक्षा व्यवस्थेचा बाता मारणाऱ्या पाकिस्तानात घुसून भारताने एअर स्ट्राइक (Operation Sindoor) केली. पाकिस्तानच्या हद्दीत प्रत्यक्षात एकही भारतीय विमानाने प्रवेश केला नाही. भारतातूनच टार्गेट सेट करण्यात आले आणि जोरदार हल्ले करण्यात आले. हल्ले सुद्धा इतके अचूक होते की जे ठरवलं तेच घडलं. भारताच्या या स्ट्राइकनंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.

‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय

follow us