Indus Water Treaty : भारताशी पंगा घेतल्यानंतर पाकिस्तानची सगळ्याच बाजूंनी (India Pakistan War) कोंडी झाली आहे. भारताने सिंधू पाणीवाटप करार (Indua Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानने जागतिक बँकेकडे (World Bank) दाद मागितली. परंतु, याठिकाणी पाकिस्तानचे नखरे चालले नाहीत. जागतिक बँकेने पाकिस्तानच्या सगळ्याच अपेक्षा मातीमोल केल्या. या करारात आम्ही फक्त मध्यस्थ आहोत आणि यात आम्हाला काहीच करता येणार नाही असे जागतिक बँकेने स्पष्ट केले.
जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले, यात आमची भूमिका फक्त मध्यस्थाची आहे. मीडियात याबाबतीत अनेक तर्क लढवले जात आहेत की जागतिक बँक या समस्येचं निराकरण करेल. परंतु, या गोष्टी तथ्यहीन आहेत. बँक सिंधू पाणीवाटप करारात फक्त मध्यस्थ आहे.
भारतावर जागतिक दबाव टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात होता. पण येथेही त्याला मार खावा लागला. कायदा आणि न्याय राज्यमंत्री अकील मलिक यांनी न्यूज एजन्सी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की पाकिस्तान सरकार कमीत कमी तीन कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे. जागतिक बँकेत हा मुद्दा उपस्थित करण्याचा पर्यात यात आहे.
Video : 400 ड्रोनच्या माध्यमातून रेकीचा प्रयत्न; कर्नल कुरेशींनी सांगितल्या पाकिस्तानच्या कुरापती
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की भारताच्या हक्काचं पाण आता भारतासाठीच उपयोगात आणलं जाईल. मीडियात पाण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.. भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच वाहणार. सिंधू पाणीवाटप करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानला सर्वात मोठा दणका बसला आहे. भारत आता पाण्याबाबत कोणतीच माहिती पाकिस्तानला देण्यास बांधील नाही. गुरुवारी भारताने सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले होते. करार स्थगित झाल्यानंतर धरणाचे सगळेच दरवाजे भारताने बंद केले होते.
पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्वात आधी भारताने सिंधू पाणीवाटप करार (Indus Water Treaty) स्थगित केला. यामुळे पाकिस्तानात पाण्याचं संकट निर्माण झालं. सिंधू नदीच्या पाण्याच्या माध्यमातून पाकिस्तानातील 17 कोटी लोकांना पाणी मिळत होते. भारताच्या या निर्णयाविरुद्ध पाकिस्तान यूएनमध्ये जाण्याची तयारी करत आहे. याआधी पाकिस्तानने जागतिक बँकेकडे दाद मागितली होती. मात्र येथेही पाकिस्तानला काहीच मिळाले नाही. भारताने दोन दिवसांपूर्वी चिनाब नदीचे पाणी रोखले. यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील नद्या ओढे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे.