Video : 400 ड्रोनच्या माध्यमातून रेकीचा प्रयत्न; कर्नल कुरेशींनी सांगितल्या पाकिस्तानच्या कुरापती

India Pakistan War Situation Updates : भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान (India Pakistan War) बिथरला आहे. यातच काल भारतात पाकिस्तानने ड्रोन्स आणि मिसाइल्सच्या मदतीने हल्ले केले. या हल्ल्यांना निष्फळ करण्याचे काम भारतीय सैन्याने केले. नंतर पाकिस्तानात हवाई हल्ले सुरू केले. या घडामोडींची माहिती आज संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पाकिस्तानने वापरलेले ड्रोन तुर्कस्तानचे. पाकिस्तानचा 36 ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न. पाकिस्तानने 300 ते 400 ड्रोन्सने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने चार ड्रोन्सच्या मदतीने प्रतीहल्ला केला. पाकिस्तानने भारताची हवाई हद्द पार केली. पाकने भारताच्या 36 ठिकाणांवर 400 ड्रोन डागले. पाकचे सर्व हल्ले सैन्याने हाणून पाडले, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तानकडून तुर्कीच्या ड्रोन्सचा वापर
पाकिस्तानकडून भारताच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानने तुर्की ड्रोनसह अनेक क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. ड्रोनच्या ढिगाऱ्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार ते तुर्कीचे अस्सिगार्ड सोंगर ड्रोन आहेत.
टेरीटोरीअल आर्मी अॅक्टिव्ह; सचिन अन धोनीसह अनेकांना जावं लागू शकत युद्ध मैदानात
पाकिस्तानने भारतावर 400 ड्रोन्स डागले
८-९ मे च्या रात्री पाकिस्तानने लष्करी (Pakistan Army) तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हल्ला केला. इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. हे ड्रोन तुर्कीचे होते. भारताने बहुतेक ड्रोन नष्ट केले. पाकिस्तानने ३६ ठिकाणी ४०० हून अधिक ड्रोनने हल्ला केला अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.
पाकिस्तान करतोय नागरी विमानांचा वापर
पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढालीसारखा वापर. पाकिस्तानने काल भारताची हवाई हद्द पार केली. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान. नागरी विमानांवर भारताने हल्ला न करता संयम बाळगला. पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय सैन्याने अत्यंत जबाबदारीने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानमधील एक रडार उद्धवस्त करण्यात भारताला यश मिळालं, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
काल रात्री पाकिस्तानने भ्याड हल्ले केले. भारतातील शहरे आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले असे विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान जखमी
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की पाकिस्तानी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानचे चार एअर डिफेन्स साइट्सवर ड्रोन हल्ला केला. यात एक ड्रोन एडी रडारला नष्ट करण्यात सक्षम होता. पाकिस्ताने एलओसीवर गोळीबार केला. यात भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाले आहेत. भारताने प्रत्युत्तर दिल्यानंतर या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले.