टेरीटोरीअल आर्मी अॅक्टिव्ह; सचिन अन धोनीसह अनेकांना जावं लागू शकत युद्ध मैदानात

टेरीटोरीअल आर्मी अॅक्टिव्ह; सचिन अन धोनीसह अनेकांना जावं लागू शकत युद्ध मैदानात

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड (India Pakistan War) वाढला आहे. यातच भारत सरकारने टेरिटोरियल आर्मी (प्रादेशिक सेना) सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदींना टेरिटोरियल आर्मी रुल्स 1948 चे नियम 33 नुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अंतर्गत द्विवेदी प्रादेशिक सैन्याच्या कोणत्याही अधिकारी किंवा जवानाला सैन्याच्या मदतीसाठी बोलावू शकतात.

14 बटालियन्स सक्रिय

या आदेशानुसार सद्यस्थितीतील 32 इन्फंट्री बटालियनपैकी 14 बटालियन्सना सक्रिय करण्यात आले आहे. या बटालियन्सना देशाच्या विविध ठिकाणच्या सैन्यांत तैनात करण्यात येईल. यामध्ये दक्षिण कमान, पूर्व कमान, पश्चिमी कमान, केंद्रीय कमान, उत्तरी कमान, दक्षिण-पश्चिमी कमान, अंदमान निकोबार कमान आणि आर्मी ट्रेनिंग कमान (ARTRAC) यांचा समावेश आहे.

काल पाकिस्तानने भारतात काही ठिकाणी ड्रोन हल्ले केले. सर्व हल्ले पाकिस्तानने निकामी केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या अनेक शहरांवर भारतीय सैन्याने तुफान हल्ले केले. यानंतर केंद्र सरकारने सैन्याच्या मदतीच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. ताज्या रिपोर्ट्सनुसार ड्रोनच्या माध्यमातून विस्फोटक आणि हत्यारे पाडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूर सुरू असतानाच ट्रेंड होतंय ‘IC 814’; जाणून घ्या, कंधार विमान हायजॅकची कहाणी..

प्रादेशिक सेनेत देशातील सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असतो. सामान्य जीवनातील विविध घटकांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना या सेनेत प्रवेश दिला जातो. आवश्यकता असेल तेव्हा या प्रादेशिक सेनेची मदत घेतली जाते. सध्याच्या परिस्थितीत जर प्रादेशिक सेनेची नियुक्ती झाली तर यामुळे सैन्याचं बळ आणखी वाढेल तसेच सीमावर्ती भागात निगराणी आणि प्रत्युत्तराच्या कारवाईची क्षमताही वाढणार आहे.

धोनी, सचिन ते अनुराग ठाकूर, प्रादेशिक सैनिक..

भारताच्या टेरिटोरियल आर्मीत देशातील काही मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे. अभिनेते मोहनलाल सुद्धा लेफ्टनंट कर्नल म्हणून प्रादेशिक आर्मीत आहेत. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राही या सेनेत आहेत. आता जर गरज पडली तर या लोकांनाही युद्धाच्या मैदानात उतरावं लागू शकतं.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टेनिसपटू सानिया मिर्झाची पोस्ट चर्चेत; काय दिली प्रतिक्रिया ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube