Operation Sindoor : भारतानं पाकिस्तानात एअर स्ट्राइक करुन पहलगाम हल्ल्याचा (Opration Sindoor) बदला घेतला. अतिरेकी जेव्हा गाढ झोपेत होते तेव्हाच मिसाइल बरसल्या आणि या अतिरेक्यांचा नायनाट झाला. यानंतर भारतात काय चित्र होतं. भारतानं धाडसी कारवाई केली अन् जगाला वेगळा (India Pakistan War) संदेश दिला. भारतीय सैन्याने ज्यावेळी (Indian Army) या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं. मध्यभागी विदेश सचिव विक्रम मिस्त्री. त्यांच्या उजव्या बाजूला कर्नल सोफिया कुरेशी (Sofia Qureshi) तर डाव्या बाजूला विंग कमांडर व्योमिका सिंह होत्या. त्यांच्या पाठीमागे एक मोठी स्क्रिन होती.
Video : अचूक ऑपरेशन अन् हनुमानाचा आदर्श; ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह काय म्हणाले?
या स्क्रिनवर 1.40 मिनिटांचा एक व्हिडिओ सुरू होतो. सुरुवातीला इंग्रजीत एक मेसेज दिसतो. ज्यावेळी जग नव्या पिढीचं स्वागत करत आहे त्याचवेळी भारत मात्र सीमेपलीकडील दहशतवादाशी सातत्याने संघर्ष करत आहे. मेसेजनंतर लगेचच पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांची मालिकाच सुरू होते. 2001 मधील संसदेवरील अतिरेकी हल्ला, 2002 मध्ये अक्षरधाम मंदिरावर झालेला हल्ला.
त्यानंतर 2008 मधील मुंबई हल्ला, 2016 मधील उरी दहशतवादी हल्ला, 2019 मधील पुलवामा अटॅक आणि सर्वात शेवटी पहलगामचा दहशतवादी हल्ला डोळ्यांसमोर येतो. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घातल्या. यात फक्त पुरुषांना टार्गेट करण्यात आले. 26 जणांचा मृत्यू झाला आणि 17 पर्यटक जखमी झाले.
यानंतरचा स्क्रिनवरचा मेसेज लक्ष वेधून घेणारा होता. मागील दशकात सीमापार दहशतवादाने 350 पेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला. 800 लोक जखमी झाले. देशाचे रक्षण करताना 600 जवानांना सर्वोच्च बलिदान दिले. 1400 पेक्षा जास्त जखमी झाले. मग येतात दोनच शब्द NO MORE. म्हणजेच आता बस..
मेसेज १ : भारत आता सहन करणार नाही
पाकिस्तान आणि पीओकेमध्ये १०० किमी आत प्रवेश करून भारताने ठळक शब्दात स्पष्ट संदेश दिला आहे. परराष्ट्र मंत्रालय, लष्कर आणि हवाई दलाच्या ब्रीफिंगमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतरग्त करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याची माहिती देण्यात आली. संसदेवरील हल्ल्यापासून ते पहलगामपर्यंतच्या दहशतवादाच्या जखमा जगाला दाखवून भारताने हा संदेश स्पष्ट केला आहे की, दहशतवादावर कडक कारवाई केली जाईल आणि ती जोरदार असेल हेत दाखवत भारत आता आणखी हल्ले सहन करणार नाही हे यातून अधोरेखित करण्यात आले आहे.
Operation Sindoor : अखेर पहलगामचा बदला घेतला, पण भारतानं माणुसकीही जपली…वाचा कसं?
मेसेज 2 : दोन महिला अधिकाऱ्यांचा संदेश काय?
ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी लष्कर आणि हवाई दलातील दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या विंग कमांडर व्योमिका. संसदेवरील हल्ल्यापासून ते पहलगाम हल्ल्यापर्यंत, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी अनेक विवाहित महिलांचे सिंदूर नष्ट केले आहे, ते लक्षात घेऊन या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले असे मानले जाते. हे नाव स्वतः पंतप्रधान मोदींनी लष्कराला सुचवले होते असेही सांगितले जाते. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करून भारताने वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या लेकी उत्तर देऊ शकतात.
Operation Sindoor : ‘मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं…’, मोदींच्या कुंडलीत नेमकं काय लपलंय?
मेसेज 3 : दहशतवादाविरोधात हिंदू अन् मुस्लिम एकत्रचं
ऑपरेशन सिंदूरबाबत ब्रिफिंग करताना भारतीय लष्कराने तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा संदेश जगाला दिला आहे तो म्हणजे, पहलगामध्ये जरी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारत देशातील सामाजिक सौहार्द खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देताना भारतीय लष्कराने भारतात हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही दहशवादाला तोंड देण्यासाठी हातात हात घालून लढण्यास तयार असल्याचा मोठा संदेश दिला आहे. कारण प्रेस ब्रिफ करणाऱ्यांमध्ये कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोघींना विशेष स्थान देण्यात आले होते.