Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’

Operation Sindoor : गुंगारा देणारी मिसाइल अन् नवं कोरं राफेल ठरलं अतिरेक्यांचा ‘कर्दनकाळ’

Operation Sindoor : भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) दणक्यात बदला आहे. बळकट सुरक्षा व्यवस्थेचा बाता मारणाऱ्या पाकिस्तानात घुसून भारताने एअर स्ट्राइक (Operation Sindoor) केली. पाकिस्तानच्या हद्दीत प्रत्यक्षात एकही भारतीय विमानाने प्रवेश केला नाही. भारतातूनच टार्गेट सेट करण्यात आले आणि जोरदार हल्ले करण्यात आले. हल्ले सुद्धा इतके अचूक होते की जे ठरवलं तेच घडलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशी कोणती टेक्नॉलॉजी आणि हत्यारांचा वापर भारतीय सैन्याने (Indian Army) केला. चला तर मग याचीच माहिती घेऊ या..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) सल्ल्यानुसार या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. या मोहिमेत भारताने अशा घातक हत्यारांचा वापर केला की अख्ख्या पाकिस्तानात हलकल्लोळ माजला. आजमितीस संपूर्ण पाकिस्तानात फक्त भारताच्या एअर स्ट्राइकचीच (Air Strike) चर्चा सुरू आहे.

या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता. पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरील हल्ल्यांचे इनपुट्स गुप्तचर यंत्रणांनी दिले होते. सर्व हल्ले भारतातूनच करण्यात आले.

भारताने फक्त ‘या’ 9 ठिकाणांनाच का टार्गेट केलं? ‘ऑपरेशन सिंदूर’चा खरा उद्देश जाणून घ्याच!

हल्ल्यात स्कॅल्प मिसाइलची ताकद

भारताने स्कॅल्प मिसाइलच्या मदतीने पाकिस्तानात हल्ले केले. या मिसाइलला राफेलने लाँच केले होते. या मिसाइलचा वेग Mach पॉइंट 8 आहे. मिसाइल 560 ते 600 किलोमीटरपर्यंत मारा करण्यात सक्षम आहे. शत्रू देशाच्या रडारला गुंगारा देण्यातही मिसाइल प्रभावी आहे. ही मिसाइल किल वेब रणनितीचा हिस्सा आहे. आजमितीस भारताकडे अशा 300 पेक्षा जास्त स्कॅल्प मिसाइल आहेत. भारताने या हल्ल्यात स्टँड ऑफ हत्यारे, ड्रोन आणि दारुगोळ्यासह अन्य हत्यारांचाही वापर केला असे सांगितले जात आहे.

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.35 PM

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.35 PM

फक्त 25 मिनिटांत खेळ खल्लास

भारतीय सैन्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी एअर स्ट्राइक करण्यात आली. 1.30 वाजता हल्ले संपले होते. जवळपास 25 मिनिटांत 21 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांत दहशवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. या हल्ल्यांत 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. भारताच्या या एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी मसूद अजहरचे कुटुंब देखील मारले गेले. त्याच्या कुटुंबातील दहा सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.36 PM

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.36 PM

RAW कडून टार्गेट सिलेक्शन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नेवी, आर्मी आणि एअर फोर्सना भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने माहिती पुरवली होती. रॉनेच या दहशतवादी अड्ड्यांचे सिलेक्शन केले होते. भारतीय वायूसेनेच्या एअर स्ट्राइकमध्ये लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यात आले. या ठिकाणांवर पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या अधिकाऱ्यांचेही येणे जाणे असायचे.

फक्त 9 ठिकाणीच का झाली कारवाई

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानात 9 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास बारा अतिरेकी ठिकाणांवर हल्ला केला. हे टार्गेट पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटरपर्यंत होते. हल्ला करण्याआधी या ठिकाणांची खात्री करण्यात आली होती. नंतर त्यांना ट्रॅक करण्यात आले आणि एअर स्ट्राइक करुन पूर्ण उद्धवस्त करण्यात आले.

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.36 PM (1)

WhatsApp Image 2025 05 07 At 5.19.36 PM (1)

याच दहशतवादी अड्ड्यांतून भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणावर केल्या जात होत्या. अतिरेक्यांची घुसखोरी येथूनच होत होती. या ठिकाणच्या प्रशिक्षण केंद्रांतून अतिरेक्यांना ट्रेनिंग दिले जात होती. यातील काही अड्डे पाकव्याप्त काश्मिरात तर काही अड्डे थेट पाकिस्तानात होते. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करणे आव्हानात्मक होते पण तितकेच गरजेचेही होते. तिन्ही सैन्य दलांनी ठरवलं. राजकीय इच्छाशक्तीचीही जोड होतीच. प्लॅनिंग केलं आणि एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube