Download App

NDA vs INDIA ; विरोधी पक्षांच्या ‘INDIA’नावावर आक्षेप, दिल्ली पोलीसात तक्रार

Opposition Parties Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी 26 विरोधी पक्ष बंगळुरू येथे एकत्र आले होते. या बैठकीत ‘यूपीए’ ऐवजी’ इंडिया’ असे आघाडीचे नामकरण करण्यात आले होते. आता हे नाव वादात सापडण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीचे नाव ‘INDIA’ ठेवल्याप्रकरणी दिल्लीच्या बाराखंबा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अवनीश मिश्रा नावाच्या व्यक्तीने 26 राजकीय पक्षांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारताचा वापर राजकीय फायद्यासाठी होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वैयक्तिक फायद्यासाठी भारत हे नाव ठेवण्यात आले आहे, त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.

कोणत्या 26 पक्षांविरुद्ध तक्रार करण्यात आली?
या 26 पक्षांमध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी, जेडीयू, तृणमूल काँग्रेस, डीएमके, राष्ट्रीय जनता दल, जेएमएम, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरएलडी, अपना दल (C), जम्मू-कश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआयएम, सीपीआय आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन यांचा समावेश आहे.

याशिवाय आरएसपी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, विदुथलाई चिरुथैगल काची, कोंगुनाडू मक्कल देसिया कच्ची, मनिथनेया मक्कल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग हे पक्ष सहभागी आहेत.

2024 मध्ये NDA vs INDIA… पण देशात युतीचे राजकारण कसे सुरू झाले?

‘इंडिया’ चे पूर्ण रूप काय आहे?
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बंगळुरू येथे 26 विरोधी पक्षांच्या बैठकीत सांगितले की, ‘आमच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया)’ असेल. या प्रस्तावाला सर्व पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला होता.

Tags

follow us