No Confidence Motion Accepted In Loksabha : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला असून, सभापतींनी अविश्वास ठरावावर चर्चेला परवानगी दिली आहे. यावर सविस्तर चर्चा करून तारीख जाहीर करणार असल्याचे सभापतींनी स्पष्ट केले आहे. गौरव गोगोई यांनी काँग्रेसच्यावतीने अविश्वास प्रस्ताव मांडला होता, त्यानंतर 50 हून अधिक खासदारांनी त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावात किती ताकद आहे? तसेच लोकसभेत कोणाचे किती सदस्य आहेत ते जाणून घेऊया.
‘बऱ्याच वर्षांनी कळलं NDA नावाचा अमिबा जिवंत आहे’; उद्धव ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला
यावेळीही धडा शिकवणार – प्रल्हाद जोशी
लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सरकार आमचे ऐकत नाही, अशा परिस्थितीत अविश्वास प्रस्तावाशिवाय दुसरा मार्ग नाही. दुसरीकडे विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यापूर्वीही धडा शिकवला आहे आणि यावेळीही धडा शिकवणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
Lok Sabha Speaker Om Birla accepts the No Confidence Motion against Government moved by the Opposition.
The Motion was brought to the House by Congress MP Gaurav Gogoi. pic.twitter.com/1HbArz5B7N
— ANI (@ANI) July 26, 2023
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावात किती ताकद ?
अविश्वास प्रस्तावात विरोधकांचा पराभव होईल, असे जाणकारांचे म्हणणे असून, लोकसभेतील बहुमताचा आकडा 269 असून सरकारसोबत 329 सदस्य आहेत, तर 142 सदस्य सरकारच्या विरोधात आहेत.
‘ही कसली मुलाखत ही तर जळजळ, मळमळ अन् अपचनाचे करपट ढेकर’; शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
लोकसभेत कोणाचे किती सदस्य ?
भाजप-301, AIADMK-01, शिवसेना (शिंदे)-13, RLJP (पारस)-05, अपना दल (एस)-02, इतर-07
सरकारच्या विरोधात कितीजण?
INC-49, TMC-23, राष्ट्रवादी-05, CPM-03, NC-03, DMK-24, JDU-16, शिवसेना (उद्धव गट)-06, SP-03, इतर -10
इंदिरा गांधींच्या विरोधात सर्वाधिक अविश्वास प्रस्ताव
दरम्यान, विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने पुढील दिवसांमध्ये विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. यात इंदिरा गांधींविरोधात सर्वाधिक 15 वेळा अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे.