‘बऱ्याच वर्षांनी कळलं NDA नावाचा अमिबा जिवंत आहे’; उद्धव ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला
Uddhav Thackeray criticized PM Modi : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी बंगळुरूच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन केली आहे. यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने विस्तारण्यास सुरुवात केली. काही पक्षांनी एनडीएत एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत या एनडीएवर जोरदार प्रहार केला.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. राऊत यांनी या मुलाखतीत एनडीएच्या बैठकीबाबत प्रश्न विचारला.
पुरस्कार वापसीवर केंद्र सरकार लावणार लगाम, ‘हमीपत्र लिहून घेणार’
त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात एनडीए नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं. आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्याची इंडिया नावाची एक आघाडी झाली आहे. या आघाडीला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि ३६ पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली.
ते पुढे म्हणाले, राज्यपाल नावाचं पद असतं, त्या पदावर केंद्राच्या अखत्यारितून राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून एक व्यक्ती बसविली जाते. पण, मणिपुरला राज्यपाल आहेत का? मणिपूर राज्याच्या राज्यपाल महिला, देशाच्या राष्ट्रपती महिला अशा देशात महिलांवर आपत्ती का येते? महिला म्हणून देशात जे चाललंय त्यावर राष्ट्रपती काय भूमिका घेणार? आपल्या देशाचा उल्लेख भारतमाता करतोय त्या मातेचा अपमान होत असेल तर काय करत आहात, असे सवाल उद्धव ठाकरेंनी केले.