Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट…

Biporjoy Cyclone : अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चाललंय. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे.(Orange alert in coastal Gujarat due to Cyclone Biparjoy) Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला […]

Gujrat

Cyclone Biparjoy : Gujrat

Biporjoy Cyclone : अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावलंय. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चाललंय. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे.(Orange alert in coastal Gujarat due to Cyclone Biparjoy)

Wrestling Federation Election : अनुराग ठाकूर यांनी दिलेला शब्द पाळला, येत्या 4 जुलैला कुस्ती संघटनेची निवडणूक

सौराष्ट्र आणि कच्छ ओलांडून 15 जूनला गुजरातच्या सागरी भागासह पाकिस्तानच्या कराची शहरात वेगाने धडकेल. यावेळी वा-यांचा वेग 145 ते 150 किमी पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गुजरातमधील कच्छ, द्वारका, जामनगर, पोरबंदर, राजकोट, मोरबी, जुनागड भागात उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा इशारा आहे.

उद्धव ठाकरेंनी दोनदा ‘मातोश्री’ला केलं होतं गुडबाय! राणेंनी सांगितली Unseen स्टोरी

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 15 जून रोजी मांडवी आणि कराची येथे धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारी घेण्यात आली आहे.

हे चक्रीवादळ 13 जूनच्या मध्यरात्री 2.30 वाजता वर ईशान्य आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर पोरबंदरच्या नैऋत्येस सुमारे 290 किमी आणि जाखाऊ बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस 360 किमी अंतरावर केंद्रित झालं असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. तर बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळपर्यंत जखाऊ बंदराजवळ सौराष्ट्र आणि कच्छ पार करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version