Maldives : मालदीव बॅकफुटवर आल्याची बातमी समोर आली आहे. मालदीव असोसिएशनने ट्रॅव्हल्स इज माय ट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी यांना पत्र लिहुन विमानांचं बुकींग पुन्हा सुरु करण्याबाबतची विनवणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीप्पणी केल्यानंतर निशांत पिट्टी यांनी विमानांचं सर्व बुकींग रद्द केलं होतं. अखेर आता मालदीव असोसिएशनकडूनच त्यांना विनवणी करण्यात आली आहे.
Aarya 3: ‘लौट आई है शेरनी…’ सुष्मिता सेनच्या ‘आर्या 3’चा दमदार टीझर प्रदर्शित
मालदीवच्या मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल टिप्पणी केल्यानंतर, ईज माय ट्रिपच्या सीईओने मालदीवसाठी सर्व बुकिंग रद्द केले होते. भविष्यात कोणतीही बुकिंग करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. Ez My Trip ने बुकिंग रद्द केल्याने मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे पत्र लिहुन विनवणी करण्यात आली आहे.
Girish Mahajan : शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी फरक पडत नाही; महाजनांचे मोठे विधान
नेमका वाद कसा सुरू झाला?
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर त्यांनी लक्षद्वीपच्या समुद्रकिना-याची छायाचित्रे इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करताना, लोकांनी बाहेर जाण्याऐवजी समुद्रकिनारी पर्यटनासाठी लक्षद्वीपला भेट द्यावी, असे म्हटले होते. यानंतर मालदीवच्या तीन उपमंत्र्यांसह इतर काही राजकीय मंडळींनी पंतप्रधान आणि लक्षद्वीपबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर भारतीय संतप्त झाले आणि हजारो भारतीयांनी मालदीवसाठी बुकिंग रद्द केले. चित्रपट आणि क्रीडा जगताशी निगडीत प्रसिद्ध व्यक्तींशिवाय इतर जाणकारांनीही लोकांना बाहेर न जाता लक्षद्वीपला पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. मात्र त्यावरून मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय पर्यटनावर अपमानजनक टीप्पण्णी केली. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
त्या दरम्यान आता मालदीवच्या मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री (MATI) या संस्थेने आपल्या या मंत्र्यांच्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील या खालच्या पातळीवरील टीकेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एक पत्रक जारी करत म्हटले आहे की, मालदीव असोसिएशन ऑफ टुरिझम इंडस्ट्री ही मालदीवच्या मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताबद्दल केलेल्या अपमानजनक तव्याचा तीव्र निषेध करत आहोत. भारत हा आमचा अत्यंत जवळचा शेजारी आहे.