मोदींवरील टीका भोवली! मालदीवला जाणाऱ्या सर्व प्लाईट्स बुकिंग रद्द, EaseMyTripचा मोठा निर्णय

मोदींवरील टीका भोवली! मालदीवला जाणाऱ्या सर्व प्लाईट्स बुकिंग रद्द, EaseMyTripचा मोठा निर्णय

All flights to Maldives canceled : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. मात्र, हे फोटो पाहून मालदीवचे काही नेत्यांचा तिळपापड झाला होता. लक्षद्वीपमधील मोदींचे फोटो पाहून मालदीवमधील सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी मोदींवर अपमानस्पद टीका केली. तर काहींनी थेट भारतीयांवर वर्णद्वेषी टीका केली. या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स चांगलेच संतापले होते. तर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनीही याप्रकरणी भूमिका घ्यायला सुरूवात केली. ट्रॅव्हल कंपनी ईज माय ट्रिपने (EaseMyTrip) मालदीवला मोठा झटका दिला आहे.

‘…तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही’, मनोज जरांगे सरसकट आरक्षणावर ठाम 

EaseMyTrip ने मालदीवला जाणाऱ्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केली आहे. कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे की, EaseMyTrip ने देशाच्या एकात्मतेसाठी मालदीवच्या सर्व फ्लाइट बुकिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय झालं होतं?
मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांनी मोदींवर टीका करतांना विदुषक आणि इस्त्रायलची कठपुतली अशी टीका केली होती. तर सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी भारत पैसा कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करतोय, हे खेदनजनक आहे. लक्षद्वीपचं पर्यंटन तुम्हाला वाढवायचं, हे मान्य. परंतु ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही मालदीवमध्ये जी सेवा देतो तीच सेवा तुम्ही लक्षद्वीपमध्ये देऊ शकता का? तुम्ही स्वच्छ पाळू शकता का?असं म्हटलं होतं.

Shreya Bugde : ‘बोल्ड आणि ब्युटिफूल’ श्रेया बुगडेचं रुप पाहून चाहते घायाळ 

भारताने मालदीवच्या सरकार मोहम्मद मुइज्जू सरकारकडजे हा मुद्दा उपस्थित केला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या या टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला होता. भारताच्या आक्षेपानंतर मालदीव सरकानरे निवेदन जारी करत हे त्यांचं वैयक्तिमक मत असल्याचं म्हटलं होतं.

पण भारताच्या तीव्र आक्षेपानंतर मालदीव सरकारने पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मंत्री मरियण शिउना यांच्यासह मालशा शरीफ आणि महजूम मजीद या मंत्र्यांना निलंबित केले. मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम खलील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त वक्तव्यासाठी जबाबदार असलेल्या तीन मंत्र्यांना तत्काळ पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube