‘…तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही’, मनोज जरांगे सरसकट आरक्षणावर ठाम

‘…तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही’, मनोज जरांगे सरसकट आरक्षणावर ठाम

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लढा देणारे मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तहसील कार्यालयात मोडी लिपी तज्ज्ञांना जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी येथील नोंद आढळली. त्यामुळं जरांगे पाटील यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जोपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी कुणबी नोंदीचा लाभ घेणार नाही, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

राज्यावर पावसाचे ढग! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा 

मनोज जरांगेंनी मराठा समाज हा कुणबी असून सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी सरकारकडे केली. आतापर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता जरांगे यांच्या कुटूंबातील सातव्या पिढीतील कुणबी नोंद शिरूर तालुक्यात आढळून आली. विभागीय आयुक्तांच्या सूचनेवारून रविवारी मोडी तज्ञ संतोष यादव यांनी शिरूर येथील भूमी अभिलेख नमुना क्रमांक 33, 34 च्या सन 1880 मधील कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये मनोज जरांगे यांच्या कुटुंबातील सातव्या पिढीतील कुणबी अशी नोंद आढळून आली.

राज्यावर पावसाचे ढग! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा 

यावर बोलतांना जरांगे म्हणाले, माझ्या कुणबी प्रमाणपत्राबाबत काय चर्चा झाली ते मला माहीत नाही. जसं इतरांचं सापडलं तसचं माझंही सापडलं असेल. पण माझ्या वडिलांनी ते स्वीकारलं असेल तर मला माहीत नाही. मात्र वडिलांनी ते स्विकारालं नसेल तर आम्ही ते स्विकारणार नाही, असं जरागेंनी म्हटलं.

जरांगे म्हणाले, सगळाच मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. मी कुठला नवसाचा नाही, जसा गोरगरिबांचा सापडलं तसंच माझी नोंद सापडली असेल. कारण आम्ही आमच्यासाठी हापापले नाही आहोत. हा लडा आमच्या लेकरांसाठी सुरू आहे. त्यामुळे माझ्यासह तमाम मराठ्यांना आरक्षण मिळेल तेव्हा मी ही नोंद स्विकारने, असं जरागे म्हणाले. माझी कुणबी नोंद सापलडी आहे, माझे तिथे गेले होते, पण ते तिथे गेले होते की, त्यांना नेलं होतं, हा देखील प्रश्न असल्याची शंका जरागेंनी व्यक्त केली. गेल्या तीन-चार दिवसांपासून माझ्या प्रमाणपत्राची चर्चा का सुरू आहे, अशी शंका मलाही येऊ लागली असल्याचे जरांगेंनी सांगितले.

सर्व गावांचे रेकॉर्ड सापडले – रावसाहेब जरांगे

शिरूर तहसील कार्यालयात मनोज जरांगे यांची कुणबी नोंद सापडली आहे. काही दिवसांपूर्वी अंतरवली सराटीमध्ये एकही कुणबी नोंद आढळली नसल्याचं समोर आलं होतं. मात्र आता आमच्या सगळ्या गावाच्या कुणबी नोंदी इथे सापडल्या असल्याची माहिती जरांगेंचे वडील रावसाहेब जरांगे यांनी दिली.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटस संपला. मात्र, सरकारने कोणतीही कार्यवाही न केल्यानं जरांगे पाटील आता मुंबईत उपोषण करणार आहेत. जरांगे 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube