Download App

Video : आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका करणारा ‘मुजोर’ अटकेत…

मध्य प्रदेशातल्या सिधी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुजोर तरुणाने एका आदिवासी मजुराच्या अंगावर लघुशंका केल्याचा व्हिडिओ समोल आला आहे. दरम्यान, व्हिडिओची दखल घेत पोलिसांकडून या मुजोर तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पाले कोल असं या आदिवासी मजुराचं नाव असून तो करोंडी गावचा रहिवासी आहे. हा मजुर एका ठिकाणी बसलेला होता. आदिवासी मजुरावर लघुशंका करणाऱ्या तरुणाचं नाव प्रविण शुक्ला असून तो भाजप आमदार केदार शुक्ला यांचा प्रतिनिधी असल्याचे बोलले जातयं. आदिवासी मजुराच्या जवळ येत या मुजोर प्रविण शुक्लाने मजुराच्या अंगावर लघुशंका केली.

मनातील मुख्यमंत्री ‘अजितदादा’ म्हणणारे देवेंद्र भुयारही फिरले… शरद पवारांना अपक्ष आमदारांचे पाठबळ

मजुराच्या अंगावर लघुशंका करताना प्रविण शुक्ला व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावेळी पीडित मजुराच्या अंगावर, तोंडावर आणि डोक्यावर त्याने लघवी केलीय. संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर काल व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नसल्याची ग्वाही दिली होती.

Ajit Agarkar; मराठमोळा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष, बीसीसीआयची घोषणा

संतप्त घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री चौहान यांच्याकडून देण्यात आले होेते. त्यानूसार पोलिसांनी तपास घेत लघुशंका करणाऱ्या प्रविण शुक्लाला बेड्या ठोकल्या आहेत. शुक्लावर सिधी पोलीस ठाण्यात कलम २९४ आणि ५०४ आणि एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित आरोपी भाजपशी संबंधित असल्याच्या चर्चांना उधाण येताच भाजपचे आमदार केदारनाथ शुक्ला यांनी आरोपी त्यांचा प्रतिनिधी नसल्याचे सांगितले आहे. तर दुसरकीडे काँग्रेसकडून आरोपी भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे.

Tags

follow us