OYO Founder : ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे 20 व्या मजल्यावरून पडून निधन

नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध OYO रूम चेनचे संस्थापक संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा आज दुपारी हरियाणातील गुरुग्राम येथे उंचावरून पडून मृत्यू झाला असल्याची महिती समोर आली आहे. मिळालेल्या महितीनुसार उंचीवरुन पडल्यामूळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची महिती खुद्द रितेश अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून आधिक तपास केला […]

Untitled Design (63)

Untitled Design (63)

नवी दिल्ली: देशातील प्रसिद्ध OYO रूम चेनचे संस्थापक संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा आज दुपारी हरियाणातील गुरुग्राम येथे उंचावरून पडून मृत्यू झाला असल्याची महिती समोर आली आहे. मिळालेल्या महितीनुसार उंचीवरुन पडल्यामूळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची महिती खुद्द रितेश अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा पोलिसांकडून आधिक तपास केला जातो आहे.

OYO चे मालक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल हे DLF द क्रेस्ट सोसायटी, सेक्टर-54, गुरुग्राम येथील इमारतीच्या 20 व्या मजल्यावर राहत होते. येथूनच पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने पारस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता अशी महिती पोलिसांनी दिली होती.

उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ पेय नक्की घ्यावी

वडिलांच्या निधनावर रितेश म्हणाले…
रितेश अग्रवाल म्हणाले की, माझे कुटुंब आणि मी सांगू इच्छितो की आमचे मार्गदर्शक आणि आमची शक्ती राहिलेले माझे वडील रमेश अग्रवाल यांचे 10 मार्च रोजी निधन झाले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य भरभरून जगले. त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आमच्या कठीण काळात पुढे जाण्याचे धैर्य माझ्या वडिलांनी आम्हाला दिले आहे.

Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष

काही दिवसांपूर्वी रमेश अग्रवाल हे त्यांचे चिंरजीव 29 वर्षीय उद्योजक रितेश अग्रवाल व गीतांशा सूद यांच्या लग्नात दिसले होते. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. दरम्यान या जोडप्याने 7 मार्च रोजी दिल्लीतील पंचतारांकित ताज पॅलेस हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते.

Exit mobile version